दुष्काळ, कर्जमाफीच्या गोंधळामुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

ऐन जोमात असलेली पिके सुकत असल्याने हाता तोंडाशी घास हिरावला जातो की काय याच विवंचनेत ते राहत असत यातच त्यांचा आई व वडिलांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेतीवर घेतलेले कर्ज होते. हे कर्जमाफ होईल व नवीन कर्ज मिळेल या आशेवर असताना अजूनही कर्ज माफी झाली नाही.

जिंतूर : तालुक्यातील दहेगाव येथील एक 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी, दुष्काळ व कर्जमाफीचा गोंधळामुळे राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्या घडली असून, तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की तालुक्यातील दहेगाव (ढोणे) येथे राहणारे अशोक एकनाथ ढोणे हे आपल्या वडिलोपार्जित शेतीवर मेहनत करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. परंतु या वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने उधारी उसनवारी तसेच खाजगी कर्ज घेऊन शेतात पेरणी केली होती. मात्र, मागील 20 दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे.

ऐन जोमात असलेली पिके सुकत असल्याने हाता तोंडाशी घास हिरावला जातो की काय याच विवंचनेत ते राहत असत यातच त्यांचा आई व वडिलांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेतीवर घेतलेले कर्ज होते. हे कर्जमाफ होईल व नवीन कर्ज मिळेल या आशेवर असताना अजूनही कर्ज माफी झाली नाही. म्हणून अधिकच निराशाजनक झाल्याने आपल्या कुटुंचा उदरनिर्वाह कसा चालवावा याच विवनचतेत त्यांनी 22 ऑगस्टला रात्री 1 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी फवारणीसाठी आणलेले विषारी औषध प्राशन केले. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथमोपचार करून परभणी येथे हलविण्यात आले होते. परंतु जिल्हा रुग्णालयात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान तरुण शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व तीन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: youth farmer suicide in Jintur Latur