जालन्याच्या कुंडलिका नदीत तरूण गेला वाहून, शोध मोहिम सुरुच

उमेश वाघमारे
Tuesday, 18 August 2020

जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीवरील जालना-रोहणावाडी मार्गाला जोडणाऱ्या छोट्या पुलावरून नदीपात्राचे पाणी वाहत आहे. या पुलावरून सोमवारी (ता.१७) रात्री दुचाकीसह एक तरूण वाहून गेला आहे.

जालना : जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीवरील जालना-रोहणावाडी मार्गाला जोडणाऱ्या छोट्या पुलावरून नदीपात्राचे पाणी वाहत आहे. या पुलावरून सोमवारी (ता.१७) रात्री दुचाकीसह एक तरूण वाहून गेला आहे. अग्निशामक दलाच्या पथकाने नदीपात्रातून दुचाकी बाहेर काढली आहे. मात्र, अद्यापी वाहून गेलेल्या तरूणाचा काहीच पत्ता लागले नाही. जालना-रोहणावडी या मार्गावर कुंडलिका नदीपात्रात छोटा पुल आहे.

मागील पाच दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील सीन व कुंडलिका या दोन्ही नद्या दुथडीभरून वाहत आहेत. कुंडलिका नदीपात्राचे पाणी रोहणावडीकडे जाणाऱ्या छोटा पुलावरून वाहत आहे. परंतु, अनेक जण पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून जीवमुठीत धरून दुचाकीवरून ये-जा करीत आहेत. सोमवारी सकाळी दुचाकीवर निघालेल्या एक व्यक्ती व एक मुलीग या कुंडलिका नदीपात्रावरील पुलावरून जातांना पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने दुचाकीसह दोघे नदीपात्रात वाहून गेली होते.

वडील करतात शेती, मुलगा मालिकेत हिरो, लातूरचा कपिल गाजतोय राज्यात

मात्र, येथील नागरिकांनी या दोघांचा जीव वाचविला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा सोमवारी (ता.१७) रात्री एक तरूण दुचाकीसह या कुंडलिका नदीपात्रावरील रोहणवाडी पुलावरून जात असताना नदीत वाहून गेला आहे. याची माहिती अग्निशामक दलास मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्रीपासून शोधकार्य सुरू केले आहे.

या शोधकार्या दरम्यान कुंडलिका नदीपात्रातून दुचाकी मिळून आली आहे. परंतु, सुमारे पाच किलोमीटरपर्यंत शोधकार्य केल्यानंतरही वाहून गेलेल्या तरूणांचा काहीच पत्ता लागला नाही. त्यात पावसाच्या संततधारामुळे नदीपत्राच्या किनाऱ्यावर चिखल असल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण होत आहे. कुंडलिका नदीपात्रात वाहून गेलेल्या तरूणांचा शोध अग्निशामक दलाकडून घेतला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Flow Into Kundalika River Jalna News

Tags
टॉपिकस
Topic Tags: