युवा प्रतिष्ठानचा पुढाकार; कोरोना रुग्णासोबत हिंगोलीत आलेल्या नातेवाईकांची राहण्याची मोफत सोय

जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता आहे. शहरी व ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. सध्या ५४२ रुग्ण उपचार घेत आहेत.
हिंगोलीत मोफत सोय
हिंगोलीत मोफत सोय

हिंगोली : येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवा प्रतिष्ठान (Corona virus) तर्फे सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच ग्रामीण भागातील शहरात येणारे रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यावर त्यांच्या सोबत येणारे त्यांचे नातेवाईक यांच्या (Relatives free stay in hingoli) राहण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेत रुग्णांच्या नातेवाईकांची निवासाची व आराम करण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Youth Foundation initiative; Free accommodation for relatives who come to Hingoli with Corona patient)

जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता आहे. शहरी व ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. सध्या ५४२ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत १४ हजार ८३३ जण कोरोना बाधित झाले असून १३ हजार ९७८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांच्या सोबत नातेवाईकाना थांबण्याची मनाई आहे. यामुळे नातेवाईकांची गैरसोय होत आहे. हे लक्षात आल्यावर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवा प्रतिष्ठानने यासाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा - वाका येथे अंगणात झोपलेल्या तरुणाचा गळा चिरुन खून; लोहा तालुक्यातील घटना

शहरात ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णासोबत येणारे त्यांचे नातेवाईक यांची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांच्या राहण्याची मोफत व्यवस्था केली आहे. ग्रामीण भागातील व इतर ठिकाणाहून कोरोना रुग्ण व शासकीय तसेच इतर दवाखान्यामध्ये हिंगोलीत आलेल्या लोकांची अडचण लक्षात घेऊन तसेच हॉस्पिटलच्या आवारात राहिल्यामुळे त्यांना संसर्ग होऊ नये व अशा परिस्थितीमुळे होणारे संक्रमण टाळण्यासाठी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या राहण्यासाठी तसेच जेव्हा त्यांना वेळ आहे तेव्हा आराम करण्यासाठी त्यांची व्यवस्था संस्थेच्या २०१६ पासून लोकांसाठी उभ्या केलेल्या इमारतीमध्ये करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त गरजूनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

संपर्कासाठी पत्ता व भ्रमणध्वनी: युवा प्रतिष्ठान , प्लॉट नंबर 88, महाकाली नगर, अकोला रोड, हिंगोली. भ्रमणध्वनी- ९७६४०२३२१४, ९९२२७५१२४१ तसेच ९२८४९२६४९८, ७७५७८७९८०१ व ९६८९३९६०२० यावर संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या त्यात ग्रामीण भागातील रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यांच्या सोबत नातेवाईकाना रुग्णालयात राहण्याची मनाई असल्याने त्यांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला व संस्थेच्या इमारतीत त्यांची व्यवस्था केली आहे. गरजुनी त्याचा लाभ घ्यावा.

- प्रा. संभाजी दादाराव पाटील, संस्थापक, युवा प्रतिष्ठान हिंगोली

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com