युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अनिल राऊत
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

खामगाव (ता.फुलंब्री) शिवारातील गट क्रमांक 129 मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली.

वडोद बाजार  ( जि.औरंगाबाद) ः खामगाव (ता.फुलंब्री) शिवारातील गट क्रमांक 129 मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. गणपत शेषराव करपे (वय 32, रा.खामगाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना   मंगळवारी (ता.एक) सकाळी सातच्या पूर्वी घडली. वडोद बाजार येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे उत्तरीय तपासणी करण्यात आली. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Hanged Himself