आष्टी (जि. बीड) - दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला. नगर-बीड राज्य मार्गावर शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. आसाराम बजरंग भारती (वय 24, रा. कासारी) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, की कासारी येथील आसाराम भारती हा युवक आष्टी येथील एका हॅटेलमध्ये कामगार म्हणून नोकरीस होता. शुक्रवारी दुपारी कासारी येथून तो आष्टीकडे दुपारी दुचाकीने आष्टीकडे निघाला होता. आष्टी शहरात नगर-बीड रस्त्यावरील बोडखे हॅस्पिटलसमोर आला असताना समोरून येणऱ्या दुचाकीशी त्याची समोरासमोर जोराची धडक झाली.
हेही वाचा - बीडमधून धनंजय मुंडे की सोळंके, मंत्रिपद कुणाला?
या अपघातात आसारामच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. परिसरातील नागरिकांनी त्यास उपचारार्थ आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत आष्टी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस हवालदार बन्सी जायभाय हे करीत आहेत.
हेही वाचा - बालानगरच्या रानमेव्याची वाटसरूंना गोडी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.