esakal | ट्रक-दुचाकी अपघातात बीडमध्ये एक ठार 
sakal

बोलून बातमी शोधा

2-whilaar.jpg

केज शहरातील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रक व दुचाकीचा जून्या पोलिस ठाण्यासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.

ट्रक-दुचाकी अपघातात बीडमध्ये एक ठार 

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (जि. बीड) : शहरातील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रक व दुचाकीचा जून्या पोलिस ठाण्यासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.

दरम्यान, हा अपघात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रविवारी (ता. २५) रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघात घडताच घटनास्थळी नागरीकांनी गर्दी केली होती.

शहरातून जाणाऱ्या बीड-अंबाजोगाई या रस्त्यावरून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास विलास मोरे (रा. लोणार, ता. कंधार, जि. नांदेड) व प्रकाश पिराजी कोमटे (वय २६ वर्ष रा. मरडसगाव ता. गंगाखेड, जि. परभणी) हे दोघे टिव्हीएस व्हिक्टर (एम. एच. २६ बी. एम. १४३३) या दुचाकीवरून अंबाजोगाई रस्त्यावरील पेट्रोल पंपावर चालले होते. हे दोघेही
चिंचोली फाट्यावरील खडी क्रशर वर कामगार म्हणून काम करत होते.

त्यांची दुचाकी शहरातील जुन्या पोलीस ठाण्याच्या समोरून जात असताना त्या रस्त्याने बाजूने  ट्रक (एम.एच.१६-एवाय ५८५९) चालला होता. दोन्ही वाहने एकाच दिशेने समांतर जात असताना दुचाकी अचानक घसरल्याने त्यावरील पाठीमागे बसलेला प्रकाश कोमटे हा ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

मात्र दुचाकी चालवणारा दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्यामुळे सुदैवाने तो बचावला. जोराने रस्त्यावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात शहरात घडल्याने घटनास्थळी नागरीक व पोलीस कर्मचारी तात्काळ उपस्थित झाल्याने जखमीला उपचारासाठी तर मृत्यू झालेला मृतदेह उच्चउत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

loading image
go to top