लातूर : जुन्या वादातून तरूणाचा खून, सात जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

शिरोळ वांजरवाडा ता. निलंगा येथील एका पस्तीस वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खुन केल्याची घटना येथील मामा भांजे हॉटेलसमोर सोमवारी(ता. 22) सकाळच्या वेळी घडली.

शिरूर अनंतपाळ, ( जि. लातूर ) : शिरोळ वांजरवाडा ता. निलंगा येथील एका पस्तीस वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खुन केल्याची घटना येथील मामा भांजे हॉटेलसमोर सोमवारी(ता. 22) सकाळच्या वेळी घडली.

 
शिरोळ वांजरवाडा येथील राजेंद्र रघुनाथ जाधव (वय 35 ) आणि प्रसाद जाधव हे दोघे गावातील बस्थानकावरील मामा भांजे हॉटेल समोर बोलत उभे होते. यावेळी चुलत भावासह आलेल्या सात जणांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून काढून चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने राजेंद्र जाधव याच्या पाठीवर सपासप वार करून खून करण्यात आला. 

प्रसाद जाधव यांच्या फिर्यादीवरून सुरेश जाधव, गणेश जाधव, संतोष जाधव, विक्रम विश्वास जाधव, विश्वास जाधव , दिलीप जाधव, भरत जाधव (सर्व रा. शिराळ वांजरवाडा ) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली असून सहा जण फरार झाले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth murdered in latur dist