मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग महत्वपूर्ण- अरूण डोंगरे

फोटो
फोटो

नांदेड : देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. त्यासाठी युवा शक्तीचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले. दहाव्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त नियोजन भवन येथे बोलत होते.

यावेळी प्रभारी पोलीस उपाधीक्षक (गृह) उत्तम मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी रोहयो सदाशिव पडदुणे, सांस्कृतिक समन्वयक तथा लेखाधिकारी निळकंठ पांचगे, जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार, विधी अधिकारी आनंद माळाकोळीकर, तहसीलदार (म.शा.) श्री. बिरादार, नायब तहसीलदार (निवडणूक) उर्मिला कुलकर्णी, नायब तहसिलदार सारंग चव्हाण, विजयकुमार पाटे, श्री. शास्त्री, दिपक मरळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मतदान हा पवित्र हक्क 

जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, मतदान हा पवित्र हक्क असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. यासाठी प्रशासनाकडून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. असे सांगून त्यांनी युवा मतदारांना या जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी उपस्थितांना मतदानाची प्रतिज्ञा दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी प्रास्ताविकात लोकसभा व विधानसभा निवडणूका जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या कुशल मार्गदर्शनाने यशस्वी पार पडल्याबाबत सांगून सर्वांचे अभिनंदन केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. खल्लाळ यांनी निवडणूक विषयक प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय मतदार दिवसाचा अप्रतिम संदेश

या मंचावर गुरूकुल इंग्लीश मिडीयम स्कुल वजिराबादच्या विद्यार्थींनी आर्या काबरा, श्रावणी दिलेराव, ईश्वरी नांदेडकर, यशश्री निलावार व स्नेहल सुरोशे यांनी विविध राष्ट्रीय थोर विदुषींच्या वेशभूषा करून राष्ट्रीय मतदार दिवसाचा अप्रतिम संदेश दिला. विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, दिव्यांग मतदान केंद्राचे कर्मचारी, मतदान जनजागृती करणारे कर्मचारी, उत्कृष्ट बीएलओ तसेच जिल्ह्यातील उकृष्ट काम केलेले अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com