हुंडा प्रथा नष्ट करण्यासाठी आता तरुणाईने पुढे यावे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

औरंगाबाद - ‘हुंडाच नव्हे, तर लग्नासाठी पैसे नसल्याने मुली आत्महत्या करीत असल्याच्या घटना वेदनादायी आहेत. त्यामुळे हुंडा ही प्रथाच बंद करण्यासाठी तरुणाई पुढे आल्यास नैराश्‍याचे वातावरण दूर होण्यास मदत होईल,’ असे भावनिक आवाहन अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले.

जायंट्‌स ग्रुप ऑफ औरंगाबाद प्राईड, नाम, भाईश्री फाउंडेशन आणि तोतला परिवारातर्फे बुधवारी (ता. १८) आयोजित सामुदायिक विवाह सोहळा श्रीहरी पॅव्हेलियन येथे श्री. अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, हुंडा ही समाजाला लागलेली कीड आहे. ती मुळासकट उखडून टाकण्यासाठी समाजाने विचार केल्यास नक्‍कीच सकारात्मक पाऊल पुढे पडेल. 

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आत्महत्याग्रस्त, दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील ३२ जोडप्यांचे लग्न यामध्ये लावण्यात आले. रुखवत वितरण करून, वरात  काढून विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. औरंगाबाद, जालनासह मराठवाड्यातील वधू-वर आणि वऱ्हाडी मंडळी सकाळीच विवाहस्थळी पोहोचले होते.

या सामुदायिक विवाह सोहळ्यात आत्महत्याग्रस्त तसेच अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील, अंध, अपंग जोडपी विवाहबंधनात अडकली. यावेळी श्री. बालब्रह्मचारी महाराज उपस्थित होते. नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी वस्तू, मंगळसूत्र आदी साहित्यांसह लग्नस्थळी येण्याजाण्याचा सर्व खर्च संयोजकांनी केला. 

भाईश्री रमेशभाई पटेल, भावेश पटेल, ॲड. रामेश्वर तोतला, राहुल तोतला, आमदार अतुल सावे, जायंट्‌सचे अध्यक्ष प्रवीण सोमाणी यांनी नवजोडप्यांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यासाठी सचिव अभय शहा, दिनेश मालाणी, विजय चौधरी, राजेश वैष्णव, महेश डागा, नितीन अग्रवाल, श्‍याम खटोड, गोपाल सारडा, पल्लवी मालाणी, विनोद अग्रवाल, निखिल सारडा, श्वेता सोमाणी व सरिता मालाणी यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: youth should come forward to destroy the dowry system