रोजगार नसल्याने तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

रोजगाराअभावी हवालदिल झालेल्या तरुणाने गळफास घेतल्याची बाब समोर आली. ही घटना गुरुवारी (ता.19) रात्री सव्वानऊच्या सुमारास चेलीपुरा भागात घडली. 

औरंगाबाद - रोजगाराअभावी हवालदिल झालेल्या तरुणाने गळफास घेतल्याची बाब समोर आली. ही घटना गुरुवारी (ता.19) रात्री सव्वानऊच्या सुमारास चेलीपुरा भागात घडली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मोहंमद मतीन मोहम्मद आसिफ (वय 34, रा. चेलीपुरा) असे मृताचे नाव आहे. ते काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होते. घरात आर्थिक चणचण असल्याने नेहमी ते तणावात होते. यातून त्यांनी गुरुवारी (ता.19) रात्री छताला दोरीने गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या वडिलांना दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले.

त्यानंतर मोहम्मद मतीन यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth suicide at Aurangabad