साेशल मिडीया बनले तरूणाईचे व्यसन

नवनाथ येवले 
शुक्रवार, 19 मे 2017

कधी एखाद्या गावात पारावर बसलेल्या मुलांना जाऊन विचाराव कि शेतात काम करायचंय, तीनशे रुपये रोज मिळेल, चलता का ? सगळी पोरं एका क्षणात गायब होतात. घरातील स्त्री शेतावर राबत असताना स्टॅण्डवर उभा राहून सोशल मिडीयावर आपल्या मान सन्मानाच्या गप्पा झोडतात

नांदेड - सोशल मिडीयाच्या अतिवाराने तरुण आळशी होत चाललाय... फक्त फेसबुक आणि व्हाट्सअप वर शेतकऱ्यांच्या पोस्ट करणारा युवक दिवसभर निकामी राहतो. मस्तपैकी स्टॅण्डवर गप्पा मारात पत्ते खेळत बसायचं असाच सध्या ग्रामीण भागातील तरुणांचा कार्यक्रम आहे. करिअरसाठी उपयुक्त असताना धैर्यापासून भरकटलेली तरूणाई सोशल मिडीयाच्या व्यनाधिन होत आहे.

तरूणाई कडून सोशल मिडीयाचा अतिवापर होत आहे, आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी सोशल मिडीया एक प्रभावी माध्यम ठरत आहे. ग्रामीण भागात मात्र योग्य कामासाठी वापर होत नसल्याने तरूणाईसाठी सोशल मिडीया व्यसन बनले आहे. कोणत्या नेत्याने काय केलं, कुठं कुणी काय डाव टाकले, निवडणूक, राजकारण याच्याबाहेर हा तरुण यायलाच तयार नाही. वर्षातून येणारे सगळे सण साजरे करायचे त्यासाठी स्थानिक नेत्यांकडून पैसे गोळा करायचे, गणपतीच्या मंडपाखाली पत्त्याचे डाव मांडायचे आणि पुढच्या ४-५ महिन्याची सोय करायची. नेत्याला सुद्धा या तरुणांना गुलाम कस बनवायचं हे माहित असतं. पैसे फेकले कि हि तरुण ताकद अलगद आपल्या हाताखालची मांजर बनते. सगळेच वाईट आहेत असे नाही, पण जे चांगले आहेत ते हाताच्या बोटावर मोजण्याइतके सुद्धा सापडणार नाहीत. कधी एखाद्या गावात पारावर बसलेल्या मुलांना जाऊन विचाराव कि शेतात काम करायचंय, तीनशे रुपये रोज मिळेल, चलता का ? सगळी पोरं एका क्षणात गायब होतात. घरातील स्त्री शेतावर राबत असताना स्टॅण्डवर उभा राहून सोशल मिडीयायार आपल्या मान सन्मानाच्या गप्पा झोडतात. एखादा व्हाट्सअप वर शेतीसंबंधी मेसेज आला कि मस्तपैकी पुढच्या ग्रुप वर फॉरवर्ड करून शेतकऱ्यांसाठी काहीतरी केल्याचा आव आणतो. पण गावात स्टॅण्डवर आपला फोटो छापलेला किमान एक तरी बॅनर झळकवण्यासाठी हापापलेल्यांना एखाद्या नेत्याचा वाढदिवस, सण, जयंत्या असतातच. गावाच्या राजकारणात धडाडीने उतरणारा आजचा युवक सोशल मिडीयामुळे घरासाठी काहीतरी काम करायच म्हटलं तर क्षणार्धात मागे हटतोय. कुटुंबाच्या एकून उत्पन्नाच्या तुलनेत किमतीचा मोबाईल बाळगणाऱ्या तरूणांना सोशल मिडीयाच्या व्यसनाने घेरले आहे. गावागावत तरूणाचे टोळके दिसत असले तरी शेती कामासाठी मजुरांच्या तुटवड्यावर सोशल मिडीयाचा प्रभाव आहे

Web Title: Youth under influence of Social Media