जुन्या वादातून तरुणास जिवंत जाळले; ब्राह्मणगाव येथील घटना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

गावातील नाल्याच्या जुन्या वादातून तरुणास जिवंत जाळल्याची घटना घडली. ब्राह्मणगाव (ता. सेलू) येथील वालूर रोडजवळ आज (शनिवार) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा गैरप्रकार घडला आहे.

सेलू : गावातील नाल्याच्या जुन्या वादातून तरुणास जिवंत जाळल्याची घटना घडली. ब्राह्मणगाव (ता. सेलू) येथील वालूर रोडजवळ आज (शनिवार) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा गैरप्रकार घडला आहे.

मयत तरुणाचे नाव सतीश दत्ताराव बरसाले (वय ३५ ) असे असून सतीष हा स्वत:चा ट्रॅक्टर सेलू वालूर रस्त्याने घेऊन जात होता. यावेळी काही लोकांना सतीश यांना अडवून बेदम मारहाण करत ट्रॅक्टरमधील डिझेल सतीश यांच्या अंगावर टाकून त्यांना जिवंत जाळले आहे.

स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही घटना का घडली याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The youth was burnt alive The incident at Brahmanagaon