महिलेला "झेडपी'च्या अध्यक्षपदाची सहाव्यांदा संधी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

बीड - आरक्षण सोडतीमध्ये बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने सहाव्यांदा या पदाचा मान महिलेला मिळणार आहे. सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपकडेही या पदासाठीचे दावेदार आहेत. 

बीड - आरक्षण सोडतीमध्ये बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने सहाव्यांदा या पदाचा मान महिलेला मिळणार आहे. सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपकडेही या पदासाठीचे दावेदार आहेत. 

यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून विद्या पवार, माजी आमदार उषा दराडे, शोभा पिंगळे, मीरा गांधले, गवळण मुंडे यांनी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. विद्या पवार आणि उषा दराडे या कॉंग्रेसकडून जिल्हा
परिषद अध्यक्ष राहिल्या. यामध्ये विद्या पवार यांच्याकडे काही काळासाठीच पद होते. तर आडसकर गटाला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पद देण्याचे ठरल्याने रमेश आडसकर यांनी शोभा पिंगळे यांची या पदावर वर्णी लावली होती. तर भाजपकडून गवळण मुंडे यांनी हे पद सांभाळले. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून काम केलेल्या उषा दराडे यांना नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानपरिषदेवर आमदार केले. पुन्हा एकदा जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव झाल्याने सहाव्यांदा या पदावर महिला बसणार आहे. सध्या भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही गटांकडे या पदासाठी दावेदार असणाऱ्या मातब्बर नेत्यांची संख्या मोठी आहे. 

त्याच संस्थेत सर्वोच्च पदावर 
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात परिचर्या म्हणून काम करणाऱ्या मीरा गांधले भोगलवाडी गटातून भाजपकडून निवडून आल्या. योगायोगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव
झाल्याने त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. ज्या संस्थेत शेवटच्या टप्प्यातील कर्मचारी म्हणून काम केले त्याच संस्थेचे सर्वोच्च पद त्यांना भूषविता आले.

Web Title: zp president of opportunity for woman