जिल्हा परिषद शाळेत लागणार हाऊसफुल्लची "पाटी' 

बाळासाहेब लोणे 
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

गंगापूर - इंग्रजी माध्यमाच्या शाळेला बाय बाय करून तालुक्‍यातील 267, औरंगाबाद जिल्ह्यातील 1860 विद्यार्थ्यांनी  जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. यात वाळूज (146), लासूर स्टेशन (48), शिल्लेगाव (35), रांजणगाव पोळ (12) याप्रमाणे विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

गंगापूर - इंग्रजी माध्यमाच्या शाळेला बाय बाय करून तालुक्‍यातील 267, औरंगाबाद जिल्ह्यातील 1860 विद्यार्थ्यांनी  जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. यात वाळूज (146), लासूर स्टेशन (48), शिल्लेगाव (35), रांजणगाव पोळ (12) याप्रमाणे विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

अध्यापनाचा दर्जा उंचावल्याने पालकांचा दृष्टिकोन बदलला असून, नव्या दमाच्या शिक्षकांना जुन्या शिक्षकांच्या अनुभवाची जोड मिळाल्याने परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, ज्ञानरचनावादाचा उपयोग, डिजिटल शाळा, आयएसओ दर्जा, प्रगत उपक्रमशीलतेमुळे खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी माध्यमापेक्षाही दर्जेदार शिक्षण मिळू लागल्याने विद्यार्थी तिकडे आकर्षित होत आहेत. 

गंगापूर तालुक्‍यातील आयएसओ शाळा 
बाबरगाव, मेहबूबखेडा, शिल्लेगाव वस्ती, बिमरोट वस्ती, गाजगाव, गाजरमळा, बाभूळगाव, मुर्शिदाबाद, हरसुली, सिरजगाव, जोगेश्वरी, मांगेगाव, शिंगी, वजनापूर, लासूर स्टेशन (न्यू हायस्कूल), मेंढी. 

तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळा 
एकूण जिल्हा परिषद शाळा : 239 
डिजिटल शाळा : 192 
आयएसओ दर्जाच्या शाळा : 15 
लोकसहभाग : 70 लाख 
प्रगत शाळा : 135 
उपक्रमशील शाळा : 35 
खासगीतून जिल्हा परिषदेत दाखल झालेले विद्यार्थी ः 267 

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा 
एकूण जिल्हा परिषद शाळा : 2090 
डिजिटल शाळा : 800 
आयएसओ दर्जाच्या शाळा : 58 
लोकसहभागातून रक्कम : 12 कोटी रुपये 
प्रगत शाळा : 1200 
उपक्रमशील शाळा : 200 
खासगीतून जिल्हा परिषदेत दाखल झालेले विद्यार्थी - 1860 

जिल्हा परिषद शाळांतील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासह शाळा प्रगत करून अद्ययावत शिक्षण पद्धतीचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला. लोकसहभागातून सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच शाळा प्रगत उपक्रमशील ठेवण्यात आल्याने यंदा 1860 खासगी शाळांतील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले. 
- रहिम मोगल, शिक्षणाधिकारी 

Web Title: zp school