अभ्यास गटाद्वारे गुणवत्तावाढ

जांब (ता. परभणी) - अभ्यास गटातील विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या वतीने शालेय साहित्याचे वितरण करताना शिक्षक.
जांब (ता. परभणी) - अभ्यास गटातील विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या वतीने शालेय साहित्याचे वितरण करताना शिक्षक.

जांब (जि. परभणी) - पूर्वी विद्यार्थी घरी रात्री अभ्यास करतो की नाही, याची चाचपणी शिक्षकांकडून होत असे, त्यामुळे मुलांमध्ये शिक्षकांप्रती आदरयुक्त भीती राहायची. असाच काहीसा उपक्रम जांब येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी सुरू केला आहे. गावातील १०० विद्यार्थ्यांचे २२ अभ्यास गट तयार करून शिक्षकांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

जांबची जिल्हा परिषद शाळा राज्यात आदर्श म्हणून ओळखली जाते. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शिक्षकही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी निरनिराळे उपक्रम राबवितात. इंग्रजी विषयाचे शिक्षक फारुखी शफियोद्दीन सैरोद्दीन यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासगटाची निर्मिती केली. इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांची इंग्रजी व इतर विषयांची तयारी पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

...अशी आहे रचना 
    एका गटात सात विद्यार्थी
    अभ्यासाची होते उजळणी 
    अभ्यासातील अडचणी सोडविण्यावर भर

अभ्यास गटामुळे आम्हाला अभ्यासाची गोडी लागलीच; परंतु हसत-खेळत अभ्यास पूर्ण होत आहे. इंग्रजी शब्दांचे पाठांतरही होत आहे. 
- दुर्गा अनंतराव रेंगे, विद्यार्थिनी

शाळेत शिकविलेले सहसा आम्ही गांभीर्याने घेत नव्हतो; परंतु अभ्यास गटात आल्यापासून एकमेकांमध्ये अभ्यासाची स्पर्धा लागली आहे. इंग्रजी वाचन व लेखन सुधारले आहे. आत्मविश्‍वास वाढला आहे.
-आदित्य गंगाधरराव रेंगे, विद्यार्थी

काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कमी होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तातडीने ही कल्पना सुचली. गावकऱ्यांच्या सहकार्याने व मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू केला आहे.
- फारुखी शफियोद्दीन, शिक्षक, जिल्हा परिषद प्रशाला, जांब

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचे नेहमी सहकार्य राहील.
- प्रदीपराव रेंगे, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, जांब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com