गणवेशाच्या रकमेत दोनशे रुपयांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

हिंगोली - राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सर्व शिक्षा अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या "मोफत गणवेश योजने'च्या रकमेत दोनशे रुपयांनी वाढ करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना गणवेशासाठी चारशेऐवजी सहाशे रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील 34 लाख 51 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

मोफत गणवेश वाटपात इयत्ता पहिली ते आठवीच्या मुली व अनुसूचित जाती, जमाती व दारिद्य्ररेषेखालील विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जात होते. मागील वर्षापासून गणवेशासाठी चारशे रुपयांची रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यास सुरवात झाली आहे; मात्र महागाईच्या काळात चारशे रुपयांमध्ये दोन गणवेश कसे घ्यावे? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे हलक्‍या प्रतीचे गणवेश खरेदी करावे लागत होते. यावर्षी शासनाने गणवेशाच्या रकमेत दोनशे रुपयांनी वाढ केली असून, आता सहाशे रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील सुमारे 65 हजार शाळांमधून 34 लाख 51 हजार विद्यार्थ्यांना या गणवेश योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सुमारे सव्वादोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केल्यानंतर त्याची पावती दाखवताच गणवेशाची रक्कम विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: zp school uniform 200 rupess increase sarv shiksha abhiyan