शिक्षकाविना भरली शाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

हिंगणे कन्नड (ता. वैजापूर) येथे शुक्रवारी (ता. ११) जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकाविनाच भरली. शाळेत एकच शिक्षिका असून, त्यांनी सुटी घेतल्यामुळे पाटी, दप्तर घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकाविना वर्गात बसावे लागले.

औरंगाबाद - हिंगणे कन्नड (ता. वैजापूर) येथे शुक्रवारी (ता. ११) जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकाविनाच भरली. शाळेत एकच शिक्षिका असून, त्यांनी सुटी घेतल्यामुळे पाटी, दप्तर घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकाविना वर्गात बसावे लागले. 

हिंगणे कन्नड येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत एकच शिक्षिका कार्यरत आहे. या शिक्षिकेने काम असल्याचे सांगून सुटी घेतली होती. याची माहिती विद्यार्थ्यांना नव्हती. त्यामुळे विद्यार्थी नेहमीप्रमाणे पाटी, दप्तर घेऊ शाळेत हजर झाले. दुपारपर्यंत शाळेत शिक्षिका न आल्याने काहींनी चौकशी केली असता शिक्षिका सुटीवर असल्याचे समोर आले. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना ही माहिती मोबाईलवरून कळविली.

त्यांनी चौकशी करतो असे उत्तर दिले. दरम्यान, या गावात कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे पंचायत समिती सदस्या योगिता आनंद निकम यांनी केली आहे. निवेदनावर प्रा. आनंद निकम, अमोल निकम, रवींद्र निकम, नवनाथ म्हस्के, गणेश निकम, वाल्मीक निकम, संजय काळे, कार्तिक काळे, दीपक ठोंबरे, राहुल निकम यांच्यासह गावकऱ्यांच्या सह्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP School Without Teacher Education