नांदेड:जिल्हा परिषदेच्या शाळांनी घेतला ‘डिजिटल’चा वसा

जयपाल गायकवाड
रविवार, 14 मे 2017

शाळेत एलईडी, टीव्ही, संगणक, प्रोजेक्टर, वीज, दिवे, वृक्षारोपण, बगीचा होत आहे. गावकऱ्यांचे विचार बदलले, अधिकाऱ्यांची भूमिका पालटली, काम करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक होऊ लागले. त्यामुळे अधिक उर्मी त्यांना येऊ लागली आहे. शाळा सिध्दीतही अग्रेसर काम झाले. मुल आपली वाटु लागली म्हणून झेडपीच्या शाळांचा दर्जा सुधारत आहे

नांदेड - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण कार्यान्वित झाल्यापासून या माध्यमातून मराठी शाळांमध्ये शैक्षणिक सुधारणा करुन विद्याथर्यांची शिक्षणात गाेडी वाढावी ते स्वत: कृतीयुक्त पध्दतीने शिकतील म्हणजे शाळेत टिकतील. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील शाळा, डिजिटल, कृतीयुक्त अध्यापन वर्ग (एबीसी) होत आहे. विशेष म्हणजे हा सर्व खर्च लोकसहभागातून होत आहे. या ‘झेडपी’ शाळांचा दर्जा सुधारत असल्याने तेथील किंवा जवळच्या खासगी मराठी शाळा व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना धोक्याची घंटा आहे.

गेल्या अनेक वर्षापासून झेडपीच्या शाळांची दयनिय अवस्था होती. अनेक शाळा पडल्या, छप्पर उडाले, कोठे गळे, भिंती खचल्या, पाण्याअभावी हिरवळ नाही किंवा शिक्षकांच्या कमतरतेमुळे दर्जा नव्हता. त्यामुळे या शाळांना भकास स्वरुप आले होते.
अलिकडे खेडी शहरांना जोडल्या गेली, गावात रस्ते झाले. ऑटो येऊ लागले, बसेस सुरु झाल्या त्यामुळे ग्रामीण खेड्यातील माणसाचा शहराशी संपर्क होऊ लागला. शहरात तो आला की कॉॅन्व्हेंटमध्ये जाणारी टापटीप बुट घातलेली पाठीवर स्कुलबॅग टांगलेली व हातात टिफीन घेतलेली मुले ऑटोतून स्कुल बसमधून जातांना तो पाहू लागला. आपलाही मुलगा असाच शिकला पाहिजे. फाडफाड इंग्रजी बोलला पाहिजे. असे त्या पालकांना वाटु लागले. शहरात मुलगा शिकला असा आर्थक जम त्याने बसवला. एका पाठोपाठ चार-आठ दहा मुले झेडपीतून शाळा ओस पडू लागल्या. काही ओस पडू लागल्या.काही बहाद्दरांनी अनेक खेड्यातच हे कॉन्व्हेंट सुरु केले. मुलांना शिकविणाऱ्या मॅडम, शाळेची सुंदर इमारत, बगीच्या, स्कुलबस, टाय, बुट, मोठी फी आणि सहा महिन्यातच गणुपत्रीकेत वाढलेले गुण बघून पालक हरखला. पहा कशी प्रगती झाली. असा सवाल करुन लागला. झेडपीचा मास्तर मात्र, मुकाट्याने पाहत होता. त्याला सरपंच, पोलिस पाटील किंवा शाळा समितीच्या सदस्याने कधी गुरुजी असे का ; मुलं बाहेर का चालली असे कधीही विचारले नाही. चार वर्गांना एकटाच शिक्षक शिकवत होता. अशा अवस्थेत वर्ग तुटत गेले. पटसंख्या दहाच्या अात. कशाबशा जीवमुठीत घेऊन या शाळा सुरु होत्या.

मात्र, आटीई अॅक्ट आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण जेंव्हापासून सुरु झाले. आणि काही नवीन तरुण शिक्षक उपक्रमशिल झाले तेव्हापासून झेडपीच्या शाळांना नवसंजीवनी मिळाली. गेल्या वर्षभरात तालुक्यातील बहुतांश शाळा डिजिटल झाल्या आहेत. नव्य नवरीसारख्या रंगरंगोटीने सजल्या आहेत. उपक्रमशिल शिक्षक जीप ओतून अध्ययन अध्यापन करीत आहेत. नवीन साहेब, नवे धाेरण, नवीन परिपत्रके, नवा बदल होत आहे. झेडपीच्या अनेक शाळांचा पट वाढला आहे. शिक्षकांची कमतरता कमी प्रमाणात राहिली. धोतीवाले शिक्षक जमा झाले. जिन्स घालणारे तरुण शिक्षक आले. ज्यांना संगणकाचे ज्ञान आहे. इंटरनेट, व्हॉट्सअॅप झाल्याने माहितीची देवाणघेवाण सुरु झाली. अनेक शाळा आएसओ झाल्या. अनेक शाळा पाहण्यासाठी शाळा व्यवस्थापक समिती, गावकरी मागे असलेले शिक्षक शाळेला भेट देतात. लोकवर्गणी होत आहे. ५० हजार, एक लाख, दोन लाच अशा रकमा जमा होत आहेत. शाळेत एलईडी, टीव्ही, संगणक, प्रोजेक्टर, वीज, दिवे, वृक्षारोपण, बगीचा होत आहे.
गावकऱ्यांचे विचार बदलले, अधिकाऱ्यांची भूमिका पालटली, काम करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक होऊ लागले. त्यामुळे अधिक उर्मी त्यांना येऊ लागली आहे. शाळा सिध्दीतही अग्रेसर काम झाले. मुल आपली वाटु लागली म्हणून झेडपीच्या शाळांचा दर्जा सुधारत आहे. शिक्षणामुळेच माणसाचा सर्वांगिण विकास होतो हे महात्मा ज्योतीराव फुलेंचं स्वप्न साकारताना दिसत आहे.

इंग्रजी शाळांनी घेतला धसका
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण कार्यान्वित झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत आहे. त्यामुळे खासगी व्यवस्थापनाच्या मराठी शाळा असो, की इंग्रजी माध्यमांच्या शाळा त्यांना ही धोक्याची घंटा वाटु लागली अाहे

Web Title: ZP schools on a digital mode...