बोलूया...'व्हर्च्युअल' जगातल्या सच्च्या मैत्रीबद्दल !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

आपले अनुभव शेअर करण्यासाठी:

 • ई मेल करा webeditor@esakal.com वर. Subject मध्ये लिहा Friendship
  किंवा
 • facebook.com/SakalNews वर मेसेज पाठवा
  किंवा
 • Sakal Samvad अॅप डाऊनलोड करा आणि सविस्तर लेख पाठवा
  किंवा
 • प्रतिक्रियेमध्ये सविस्तर लिहा

मैत्रीचं नातं सुंदर. जीवाभावाचं.
सुख-दुःखं शेअर करण्याचं.
जगणं समृद्ध करणारं.
हे नातं राहतं आयुष्यभर.
गेल्या दीड दशकांत या नात्याला मिळालाय नवा आयाम. 'व्हर्च्युअल फ्रेन्डशीप'चा.

सोशल नेटवर्किंग वेबसाईटस् किंवा चॅटींग अॅप्लिकेशन्सवर कुणाशी तरी मैत्री जडते. तो मित्र किंवा ती मैत्रीण कधीच प्रत्यक्ष पाहिलेली नसते. अंतरंही खूप दूरदूरची. पण, मैत्र जुळतं. अनुभवाची देवाण-घेवाण होते. सुख-दुःखं वाटली जातात. 'व्हर्च्युअल फ्रेन्डशीप' रोजच्या जगण्याचा भाग बनून जाते.

यंदाचा मैत्र दिन आहे सहा ऑगस्टला. ही संधी घेऊया आपल्या 'व्हर्च्युअल फ्रेन्डस्'बद्दल बोलण्याची.

आम्हाला पाठवा आपला अनुभव. लिहा आपल्या 'व्हर्च्युअल फ्रेन्ड'ने आपल्या आयुष्य कसं समृद्ध बनवलं...आपल्यात काय बदल घडवले...

आपले अनुभव शेअर करण्यासाठी:

'व्हर्च्युअल फ्रेन्ड'बद्दल लिहिताना हे करा:

 • युनिकोड-मराठीमध्ये आपला लेख असू द्या.
 • आपले नाव आणि पत्ता लेखाच्या शेवटी हवा. निनावी लेख प्रसिद्ध होणार नाहीत.
 • लेखाचा उद्देश सकारात्मक मैत्रीचा आहे, हे लक्षात असू द्या.
 • मैत्रीत शब्दमर्यादा नसते. तेव्हा ती काळजी नको.

चला तर मग, 'व्हर्च्युअल फ्रेन्ड'बद्दलची कृतज्ञता व्यक्त करूया...

Web Title: Marathi news friendship day messages in marathi