केवढी मोठी बाग!

muktapeeth
muktapeeth

ती बाग खूपच मोठी होती. वेगवेगळी फळझाडे एका ठरावीक उंचीत वाढवलेली होती. झाडावरून फळ तोडण्यातला आनंद घेता येतो तिथे.

अमेरिकेतील बॉस्टनजवळ पार्ली-फार्म हे मिसेस हेलननी तयार केले आहे. ते आम्ही चार-पाच वेळा पाहिले. ते पाहताना माझ्या मनात काहीबाही विचार येत राहिले.
पहिल्यांदा हा पार्ली-फार्ममध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा असे भव्य फार्म पाहून आश्‍चर्य व आनंद दोन्ही मिश्र भावना मनात जागृत झाल्या. आधी असे कधीच पाहिले नव्हते. तिथे पाऊल टाकायचा अवकाश अगदी भारावल्यासारखे झाले. सफरचंदाची झाडे आपल्या हाताला सहज फळ लागतील एवढ्या ठराविक उंचीपर्यंत, ठराविक जागेत याचे भान ठेवून वाढविली होती. याच्या पाठीमागे त्यांचे कष्ट, खर्च कौतुक करण्यासारखे आहे. सफरचंदच काय स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी त्या त्या सीझनामध्ये आम्ही गेलो होतो.

ब्ल्यूबेरी ही निळी छोटी छोटी फळे असतात. स्ट्रॉबेरी लाल फळे बहरलेली दिसतात. ही फळे पाहून असे वाटते की काय निसर्गाची किमया आहे. सफरचंदाची फळे काढताना क्षणभर असे वाटले की फळांनी भरलेल्या स्वर्गात आपण उतरलो तर नाही ना? सफरचंदाची फळे आपण जेव्हा काढतो तेव्हा आपल्या पायाशी तयार झालेली फळे पडलेली असतात.

आपण आत प्रवेश करण्याच्या आधी बास्केटस तेथे ठेवलेल्या असतात. त्यातील आपल्याला लहान-मोठी कशी हवी असेल त्याप्रमाणे आत बास्केट घेऊन जायचे. बास्केट फळांनी भरली की बाहेर आल्यावर त्या बास्केटप्रमाणे आपल्याकडून किंमत घेतात. तेथे आइस्क्रीमचे स्टॉल्स बाहेरच्या आवारात ठेवलेले असतात. आइस्क्रीमचा आस्वाद घेत तेथे मोकळ्या निसर्गात आरामशीर बसतो. हे सर्व झाल्यावर उत्साहाने घरी परततो. गेल्यावर घरी लगेच काही फळांचा जाम करून ठेवत असू. एकंदरीत निसर्गाच्या सान्निध्यात अवर्णनीय अनुभव मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com