नेहा विनीत जोशी भरतनाट्यम नृत्यांगना 

नेहा विनीत जोशी भरतनाट्यम नृत्यांगना 

नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. चौसष्ट कलांपैकी एक कला म्हणजे नृत्य. अनादी काळापासून सर्व वंशांच्या लोकांनी नृत्याचा वापर केला आहे. अगदी वेदकाळापासून नृत्य ही भारतीय संस्कृती आहे. भगवान शंकरांना नृत्याची देवता मानले गेले आहे. आणि ही अशी आपली शास्त्रीय नृत्याची परंपरा जोपासण्याचा आणि संवर्धन करण्याचं काम गेल्या वीस वर्षांपासून निष्ठेने करीत आहेत त्या म्हणजे जळगावच्या भरत नाट्यम नृत्यांगना नेहा विनीत जोशी. 

 नेहा ही मूळची बडोद्याची. आई-वडिलांच्या आग्रहावरून भरतनाट्यम शिक्षणाची सुरुवात झाली. हेच शिक्षण घेत असतानाच लोकनृत्याची पण आवड निर्माण झाली त्यामुळे गोफ, कोळी नृत्य, मंगळागौरीचे खेळ त्यात प्रावीण्य मिळवलं. तर गरबा गुजरातचा  प्रसिद्ध नृत्य प्रकार असल्याने लहानपणापासूनच गरब्याची आवड होतीच. शाळेतील प्रोत्साहनाने अनेक नृत्य स्पर्धात राष्ट्रीय स्तरावर सहभागामुळे आत्मविश्वास दुणावला. आणि मग नेहाचा नृत्य प्रवास सुरू झाला. माहेरी आणि जळगावी सासरी दोन्हीकडे प्रोत्साहन मिळाल्याने ही कला दिवसेंदिवस बहरत गेली. 

 नेहाने भरतनाट्यम मध्ये तंजावर स्टाईल मध्ये डिप्लोमा केला आहे. सुरूवातीला मधुर ज्योती अकॅडमी बडोदा येथे गुरु श्री मधुबनी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तर  पुढे भरतनाट्यम कलाक्षेत्र स्टाईलमध्ये गुरु श्री शरद पांड्या यांच्याकडे गेल्या 14 वर्षापासून नेहा शिक्षण घेत आहे. नेहाला या नृत्य शैलीचा प्रदीर्घ अनुभव आहे. 

 खरं तर जळगाव मध्ये कथक शास्त्रीय नृत्याचा जास्त प्रचार आणि प्रसार. त्यामुळे भरतनाट्यम हा नृत्यप्रकार शिकवणारे फार कोणी नव्हते. पण नेहा लग्नानंतर जळगावात आली आणि नंतर तिने भरतनाट्यम चा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली. आज नेहाकडे जवळपास दीडशे विद्यार्थी भरत नाट्यम ही कला अवगत करत आहेत. नेहाने आपल्या ॲकॅडमी द्वारे नामवंत कलाकारांचे दोन कार्यक्रम आयोजित करून भरत नाट्य मला जळगाव मध्ये चालना दिली. हळूहळू तिथे विद्यार्थी ही कला सादर करण्यासाठी तयार होत आहेत. भरतनाट्यम सोबतच नेहाला पेंटिंग आणि एम्बॉसिंग ची आवड आहे. आपल्याकले  बरोबरच आपला हा छंदही तिने जोपासला आहे. 

 नेहाला आपल्या नृत्य कलेसाठी अनेक पारितोषिके पण प्राप्त झाली आहेत. विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल मध्ये सिल्वर मेडल, नागपूर येथे लोकमत दांडिया स्पर्धेत पारितोषिक असे अनेक पुरस्कार तिला मिळाले आहेत. त्याचप्रमाणे बडोदा सीनियर सिटीजन क्लब तर्फे नेहाने शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम सादर केले आहेत. 2019 मध्ये जळगाव ला इंटरनॅशनल नृत्य महोत्सवाचे आयोजन पण केले. इतकंच नाही तर ज्या महिलांना नृत्याची आवड आहे त्या मैत्रिणींसोबत अनेक लोकनृत्य स्पर्धेत  सहभाग घेऊन बक्षीस मिळवून त्यांनाही प्रोत्साहित करण्याचं काम नेहाने केले आहे. तिचे  मोलाचे मार्गदर्शन अनेक महिलांना मिळत असते. 

 आपल्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम मध्ये उत्तम रित्या पारंगत व्हावं  या उद्देशाने प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना स्वाती दैठणकर यांच्या कार्यशाळेचं  आयोजन व कार्यक्रम आयोजित केले. त्यामुळे आता जळगाव मध्येही भरतनाट्यम शास्त्रीय नृत्याची शैली नेहा सारख्या गुणी कलावंता मुळे ओळखली जाऊ लागली आहे, आणि रुजू ही लागली आहे. अशा अतिशय निगर्वी असणाऱ्या नेहाला तिच्या भरतनाट्यम् नृत्य शैलीत विविध प्रयोग करण्यास खूप खूप शुभेच्छा.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com