प्रश्न पडलाय का ?

mahabharat.
mahabharat.

महाभारताची कहाणी, त्याचे पात्र , त्याच्या घटना, या सगळ्या गोष्टींचा विचार केला की असं वाटतं बहुधा नाश आणि असंतोष या दोघांचा फारच जवळचा आणि परस्परसंबंधित असा धागा जुळलेला आहे. आपण आजपर्यंत कितीतरी विविध प्रसंग आणि व्यक्तिरेखा पाहिल्या. वयाच बंधन तोडून वागणारे, भाऊ बंधकी न पाळणारे, स्वतःचा सतत विचार करणारे, राग , लोभ, द्वेष, मद, मत्सर इत्यादी सगळे गुण असणारे आपण पाहिले, त्यांची चर्चा केली. कुठेतरी ही गोष्ट मात्र जाणवल्याशिवाय राहत नाही की, या नाशाचं कारण म्हणजे स्वत्वाचा विचार सोडून दुसर नाही. ज्यांची वय वाढली त्यांना लहानाचा हेवा आणि वचपा होता. ज्यांना आयुष्याचा विचार आणि भविष्य घडवायची तयारी करायची होती त्यांना प्रतिस्पर्धेशिवाय दुसरं काहीही दिसलं नाही. परिणाम काय तर स्वतःच्याच घरात स्वतःच्याच लोकांना स्वतःच एकमेकांनी वैरी केल. मग झालं नाही ते व्यवस्थापन आणि मिळाला नाही तो आयुष्याच्या आनंदाचा अनुभव.

आपण चर्चा, टीका वगैरे कितीही केल्या तरी या काही महाकाव्य वा कहाण्यांमधून खूप काही शिकायलाही मिळत असतं याचा आपण विचार करीत नाही. आपण विचार काय, पण जे लोक सतत या विषयावर भाष्य करीत असतात ती तरी स्वतः कधी याचा अवलंब करतात का ? भाष्य सोडा, घरी एखादे काका, मामा व कोणीही ज्यांना तुम्ही जवळून पाहिलंय, जे सतत पोथ्या पुराण वाचत असतात आणि तुम्हाला ज्ञान पाजत असतात कधी तुम्ही खरंच त्यांना विचारल की ते याचा किती अवलंब करतात? प्रश्न आहेत आणि खूप आहेत कारण आपल्याला उदाहरणाने धडा देणारे फार कमी आहेत. ऑफिसमध्ये समोरच्याच्या कामात चुका काढत असताना आपण काय आणि कशा प्रकारे त्या चुकांसाठी स्वतःच्या कामाचं उदाहरण ठेवून मार्गदर्शन करावं याचा आपण विचारच केलेला नसतो. घरी मुलीला कामांची सवय लागावी म्हणून सतत बोलणारी आई बहुदा हे विसरली असते की त्या वयात असताना तिच्या मागे असाच कोणी तगादा लावला असताना तिला काय कारावसं वाटत होत. व्यक्ती वेगळ्या असतात तुम्ही व्यक्तीवर वा त्याच्या शैलीवर नियंत्रण करू शकत नाही.

फक्त काहीतरी मोठं काम करूनच आपण उदाहरण ठेवू शकतो असं नाही. तर स्वतःच्या स्वभाव आणि वागणुकीने पण आपण ते करू शकतो आणि समोरचाला अपमानित न करता आपलंस पण करता येतं याचाही कधीतरी प्रत्यय स्वतःला येऊ द्यावा लागतो. मोठ्यांनी वा ऑफिसमधल्या वरिष्ठांनी आपलं वय वा अनुभव याचा उहापोह न करता जरी आपल्या वागणुकीचं भान ठेवलं तर त्यांचा शंतनू, भीष्म, धृतराष्ट्र वा द्रोणाचार्य इत्यादी होणार नाही. त्यांचा मग राहील तो मान आणि मग होईल ते व्यवस्थापन. तसेच नवी पिढी आणि नवा ऑफिस वर्ग यांनी आधी झालेल्या प्रसंगांचा आणि अनुभवाचा आढावा घेऊन आणि चुकांचा मागोवा घेऊन जर काही मार्गदर्शन आणि काही बाबींमध्ये काही गोष्टींना नजरेआड कसे करायचे याचा विचार केला तर टाळता येईल तो कलह आणि जमायला लागेल ते व्यवस्थापन.

अर्थातच या सगळ्या गोष्टी बोलायला वा लिहायला कितीही सोप्या असल्या तरी प्रत्यक्षात करायला कठीण आहे. ज्याची परिस्थिती त्यालाच माहिती. पण अहो प्रत्येकचं व्यक्ती मग त्याच्या ठिकाणी बरोबर जर आहे तर मग व्यवस्थापन का होत नाही. प्रत्येकाची एक वेळ असते एक काळ असतो, पण ज्या ठिकाणी जे गरजेचं आहे ते करण्याचाच मान असतो. कधी कुठे पुढाकार घ्यायचा आणि कधी कुठे माघार हे जर लक्षात आलं तर मग नक्कीच काहीतरी जमेल. प्रश्न पडला असेल हे सर्व काय ते, प्रश्न पडायलाच हवा तरच कुठे उत्तर मिळेल. शेवटी प्रत्येकाला जर घेऊन व्यवस्थापन होत असत असं आपण जर म्हणत आहोत तर मग स्वतःलाही नीट घेऊन चालता यायला हवं. आणि एखाद्याच्या मनातून स्वतःला उतरवून घेण्यात कसला शहाणपणा. कारण काही म्हणी वा जुने विचार कितीही चलनात असले तरी वळणात मात्र सत्य परिस्थितीच असते. पहा विचार करून !!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com