रायगडमध्ये किसान क्रेडिट कार्डसाठी मच्छीमारांचे तीन हजार अर्ज; तत्काळ कर्जामुळे मच्छीमारांना दिलासा

महेंद्र दुसार | Tuesday, 1 September 2020

शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळणार आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातून तीन हजार मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय विभागाकडे अर्ज केले असून आतापर्यंत 276 मच्छीमारांना बॅंकांनी कार्डचे वाटप केले आहे. या योजनेमुळे अडीअडचणीच्या वेळी मच्छीमारांना 25 हजार ते अडीच लाखांपर्यंत उचल करता येणार आहे. 

अलिबाग : शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळणार आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातून तीन हजार मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय विभागाकडे अर्ज केले असून आतापर्यंत 276 मच्छीमारांना बॅंकांनी कार्डचे वाटप केले आहे. या योजनेमुळे अडीअडचणीच्या वेळी मच्छीमारांना 25 हजार ते अडीच लाखांपर्यंत उचल करता येणार आहे. 

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने मच्छीमारांनाही किसान क्रेडिट कार्ड देण्याचे परिपत्रक काढले आहे. शेतकरी ज्या पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेत आहेत, त्याच पद्धतीने मच्छीमारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. गरजेच्या वेळेला बॅंकेतून आवश्‍यक पैशांची उचल करायची आणि मासळीची विक्री झाल्यानंतर त्याची परतफेड करायची. पुन्हा जेव्हा गरज लागेल, तेव्हा तत्काळ पैशांची उचल करता येते.

दुर्दैवी घटना : गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्‍पच्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

कर्ज रूपात काढलेली रक्कम परत भरली की व्याज बंद होते. जेवढी रक्कम उचल करू, त्यावर 7 टक्के व्याज भरावा लागणार आहे. अशी ही योजना असून गरज असेल तेव्हा तत्काळ मच्छीमारांना तत्काळ कर्ज मिळणार आहे. याबरोबरच वेळेत रक्कम भरल्यास सरकारकडून सानुग्रह अनुदान म्हणून व्याज माफ होते. यामुळे मच्छीमारांना बोटीची दुरुस्ती, नवीन जाळी खरेदी, इंजिन दुरुस्तीसाठी आर्थिक मदतीची अडचण दूर होणार आहे. 

हेही वाचा : नागपूरमध्येही धारावी पॅटर्न? आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मायक्रोप्‍लॅनिंग!

नव्या हंगामात किसान क्रेडिट कार्ड मिळालेल्या 276 मच्छीमारांपैकी 200 मच्छीमारांनी कर्जाची उचल करत मासेमारीला सुरुवात केली आहे. या योजनेमुळे सावकाराकडून घ्याव्या लागणाऱ्या कर्जाची गरज लागणार नसल्याने मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कर्जाची दिलेल्या मुदतीत परतफेड करणाऱ्यांसाठी ही योजना खूप चांगली आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच कोकणातील मच्छीमारांनाही या योजनेचा फायदा आर्थिक अडचणीच्या वेळी घेता येणार आहे. या योजनेनुसार रायगडमधील काही मच्छीमारांनी कर्जाची उचल करण्यासही सुरुवात केली आहे. 
- सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त, 
मत्स्य व्यवसाय विभाग, रायगड 

महत्त्वाची बातमी : आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; विद्याथ्‍यार्ंना 'या' तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश!

फायदे... 
25 हजार ते अडीच लाखांपर्यंत उचल 
मासळीची विक्री झाल्यानंतर परतफेड 
त्यावर 7 टक्के व्याजाने कर्ज 
वेळेत रक्कम भरल्यास सरकारकडून व्याज माफ 

(संपादन : उमा शिंदे)