या पालिकेकडून कोरोना खर्चाच्या तपशिलाबाबत होतेय टाळाटाळ; माहितीच्या आधाराखाली मागणी

दीपक घरत
Tuesday, 1 September 2020

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील देण्यात यावा, अशी माहितीच्या अधिकाराखाली मागणी करण्यात आली आहे. मात्र, पालिकेच्या वतीने तपशील देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत नगरसेवक अरविंद म्हात्रे यांना उत्तरादाखल पाठवलेल्या माहितीत तपशीलवार माहिती नसल्याने सोमवारी (ता. 31) झालेल्या महासभेत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

पनवेल : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील देण्यात यावा, अशी माहितीच्या अधिकाराखाली मागणी करण्यात आली आहे. मात्र, पालिकेच्या वतीने तपशील देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत नगरसेवक अरविंद म्हात्रे यांना उत्तरादाखल पाठवलेल्या माहितीत तपशीलवार माहिती नसल्याने सोमवारी (ता. 31) झालेल्या महासभेत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडे जमा झालेल्या निधीबाबत आणि पालिकेच्या वतीने केलेल्या खर्चाबाबत तपशीलवार माहिती देण्यात यावी, अशी मागणी माहितीच्या अधिकाराचा वापर करून शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पालिकेकडे केली होती. म्हात्रे यांच्या मागणीनंतर पालिकेकडून उत्तरादाखल दिलेल्या माहितीत, कोरोनाकाळात सरकार आणि विविध कंपन्यांच्या माध्यमातून 9 कोटी 83 लाख 40 हजार 146 रुपये जमा झाले आहे. तसेच, औषध, पीपीई किट आणि दवाखाना यांच्यासाठी 9 कोटी 87 लाख 84 लाख 73 रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोणत्या बाबीसाठी विशेष खर्च करण्यात आला, याची तपशीलवार माहिती सांगणे टाळण्यात आले आहे. 

महत्त्वाची बातमी : आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; विद्याथ्‍यार्ंना 'या' तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश!

सोमवारी झालेल्या महासभेत म्हात्रे यांनी पाठवलेली माहिती तपशीलवार नसल्याने नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या नाराजीनंतर अधिकाऱ्यांच्या नजर चुकीमुळे तपशीलवार माहिती पाठवली नसल्याचे कबूल करत लवकरच राहिलेली माहिती पाठवण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले. दरम्यान, माहिती न पाठवण्यामागे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित होत आहे. 

दुर्दैवी घटना : गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्‍पच्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

एकेका रुपयाचा हिशोब अशक्‍य 
कोरोना संसर्ग काळात सरकारमार्फत किती निधी उपलब्ध झाला. तो किती खर्च करण्यात आला, याची एकत्रित माहिती देण्यात आली आहे. विविध मथळ्याखाली एक रुपया ते कोटी रुपये असा खर्च झाला आहे. त्याचा तपशीलवार खर्चाची माहिती आम्ही निधी उपलब्ध करून देणाऱ्यांना देऊ. सर्वांना याबाबत माहिती देणे आम्हाला शक्‍य नाही. अशी माहिती देताना आम्ही वेडे होऊन जाऊ, अशा शब्दांत पालिकेचे उपायुक्त संजय शिंदे यांनी खर्चाबाबत आपली प्रतिक्रिया दिली. 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panvel Palika doesn't given Proper information about expeses of corona