खालापुरात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संताप

मनोज कळमकर
Wednesday, 12 August 2020

खालापूर तालुक्‍यातील हाळ आदिवासीवाडीतील शांती वाघमारे या गर्भवतीचा उपचाराअभावी झालेल्या मृत्यूमुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. यात श्रमजीवी संघटनाही आक्रमक झाली आहे. 

खालापूर : तालुक्‍यातील हाळ आदिवासीवाडीतील शांती वाघमारे या गर्भवतीचा उपचाराअभावी झालेल्या मृत्यूमुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. यात श्रमजीवी संघटनाही आक्रमक झाली आहे. 

खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी (ता. 9) सात महिन्यांची गर्भवती त्रास होत असल्याने उपचारासाठी रिक्षातून आणण्यात आले होते. परंतु, तिथे डॉक्‍टर नसल्याने चौक रुग्णालयात जा, असे सांगण्यात आले होते. चौकला रुग्णालयात नेल्यानंतर उपचारापूर्वीच शांतीचा मृत्यू झाला. शांती आणि तिच्या पोटातील मूल आरोग्य यंत्रणेचा बळी असल्याचा आरोप नातेवाईक आणि वाडीतील ग्रामस्थांनी केला आहे. दोषींवर कारवाईसाठी आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

हेही वाचा : आतापर्यंत 1520 पोलिसांचा सिडकोच्या घरांना प्रतिसाद

या घटनेबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी रोकडे यांना तत्काळ फोन केला; परंतु ते क्वारंटाईन आहेत. डॉक्‍टर प्राथमिक आरोग्य केंद्रात असणे आवश्‍यक आहे. याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. 
- महेंद्र थोरवे, आमदार 

डॉक्‍टर नसल्यामुळे उपचार होत नसतील आणि बळी जात असतील, तर आरोग्य केंद्रांना टाळे ठोका. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदारांना लेखी पत्र देऊन 24 तास डॉक्‍टर आणि इतर स्टाफ राहील, अशी मागणी करणार आहोत. रुग्णालयाच्या दर्शनी भागात ड्युटी असलेल्या डॉक्‍टर आणि परिचारिकांचे नाव आणि संपर्क क्रमांकही लावण्याची मागणी करणार आहे. 
- योगिता दुर्गे, जिल्हा महिलाप्रमुख, 
श्रमजीवी संघटना, रायगड 

सावधान! महिलांनो, साडी पडेल लाखात भारी

मुंबई

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pregnant woman dead because didn't available doctor at Khalapur Primary Health centre.