बाळासाहेबांसारखा दुसरा स्टार होणे नाही - आमिर खान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 जानेवारी 2019

मुंबई - महाराष्ट्र आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार होणे शक्‍य नाही, अशा शब्दांत अभिनेता आमिरखान यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल गौरवोद्‌गार काढले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील "ठाकरे' हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेक चित्रपट निर्माते, बड्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याबाबतचा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला होता, यावर आमिर खान यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रालयातील विधीमंडळ वार्ताहर कक्षात वैद्यकीय शिक्षण विभाग आणि डॉ. संजय बोरूडे यांच्यावतीने मुलांमधील लठ्ठपणा कमी कसा करावा, या माहितीच्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन आमिर खान यांच्या हस्ते झाले. या वेळी वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not to be another star like balasaheb thackeray says Aamir Khan