"शिवाय' चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लीक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

मुंबई - अभिनेता अजय देवगणनिर्मित व दिग्दर्शित "शिवाय' हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच सोशल मीडियावर दिसू लागला आहे. वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत असणाऱ्या कमाल खानने आपल्या अधिकृत ट्विटरवर "शिवाय' चित्रपटाची लिंक शेअर केली आणि चित्रपट नक्की पाहा, असे आवाहनही केले; मात्र प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची लिंक देऊन कायद्याचे उल्लंघन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने ही पोस्ट काढून टाकली. या बेकायदा कृत्यासाठी कमालविरोधात कडक कायदेशीर पाऊल उचलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

"शिवाय'चे प्रस्तुतकर्ते रिलायन्स एण्टरटेन्मेंटने कमाल खानच्या या चुकीला माफी नसल्याचे संकेत दिले आहेत. व्हिडीओचे स्क्रीन शॉट्‌स रिलायन्स एण्टरटेन्मेंटकडे आहेत. काही हिंदी चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी परदेशात एक दिवस आधी प्रदर्शित होतात. कमाल खानने दुबईतील ज्या चित्रपटगृहात हा व्हिडीओ चित्रीत केला आहे, त्या चित्रपटगृहाच्या मालकाविषयीही तक्रार केली जाणार आहे.

Web Title: 'Shivay' movie leaked before releasing