मुंबई-पुणे मार्ग अखेर सुरू

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

18 ऑगस्टनंतर सर्व गाड्या नियमित होणार 

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावरील 12 गाड्या उद्या (ता.16) पासून सुरू होणार असून 18 ऑगस्टनंतर सर्व गाड्या नियमित सुरू होणार आहेत. लोणावळा येथे दरड कोसळल्यामुळे हा मार्ग 13 दिवसांपासून बंद होता.

मुंबई-पुणे मार्गावरील घाट भागात दरड कोसळली होती. तसेच रुळाखालील खडी वाहून जाण्याबरोबरच सिग्नलमध्येही बिघाड झाला होता. त्यामुळे 3 ऑगस्टपासून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच या मार्गावरील अनेक गाड्या रद्द, तर बहुतांश गाड्यांचे मार्ग बदलले होते. मुसळधार पावसामुळे कर्जत ते लोणावळा भागात नागनाथसह आणखी दोन भागांत रेल्वेच्या मालमत्तेची मोठी हानी झाली. त्यामुळे मध्य रेल्वेने विविध कामांसाठी 13 दिवसांपासून मुंबई ते पुणे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवली. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कालावधीसाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. मंगळवारी दरड कोसळलेल्या कर्जत ते लोणावळा भागाचा मध्य रेल्वे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेतल्यानंतर 12 गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या सुरू
हैदराबाद-मुंबई (17032), मुंबई-हैदराबाद (12701), हैदराबाद-मुंबई (12702), तिरुपती-कोल्हापूर (17415), कोल्हापूर-तिरुपती (17416), कोल्हापूर-सोलापूर (11502), मंगरुळू-कोल्हापूर (11303), पुणे-मुंबई (11010), मुंबई-पुणे (11009), मुंबई-पुणे (12123), पुणे-मुंबई (12128), पुणे-मुंबई (22106)

20 गाड्या बंद
उद्या (ता. 16) 22108 लातूर-मुंबई ही गाडी रद्द करण्यात आलेली आहे. शनिवारी आणि रविवारी (ता.17-18) 11027 मुंबई-चैन्नई, 22105-06 मुंबई-पुणे-मुंबई, 12127 -28 मुंबई-पुणे-मुंबई, 11024 कोल्हापूर-मुंबई, 12124-23 पुणे-मुंबई-पुणे, 11009-10 मुंबई-पुणे-मुंबई, 11007-08 मुंबई-पुणे-मुंबई, 22144-43 बिदर-मुंबई-बिदर, 12115-16 सोलापूर-मुंबई-सोलापूर, 07617 नांदेड-पनवेल, 17321 हुबळी-एलटीटी, 12125-26 मुंबई-पुणे-मुंबई या 20 गाड्या रद्द आहेत. याशिवाय अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai pune train will start soon