बोरीवली-पुणे वाताणुकूलित सेवेचा मुंबई विमानतळावर थांबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

मुंबई : एसटी महामंडळ प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी मुंबई विमानतळावरून सेवा देण्याच्या विचाराधीन आहे. मुंबई विमानतळावरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना खासगी टॅक्सीशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याने एसटीची बोरिवली ते पुणे वातानुकूलित सेवा मुंबई विमानतळ मार्गावरून सुरू करण्यात येणार आहे. 

राज्याबाहेरून विमान प्रवाशांना मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पुणे जाणाऱ्यांसाठी कोणतीही वातानुकूलित सेवा नसल्याने एसटी महामंडळाची मुंबई विमानतळाशी जोडणी केल्या जाणार आहे. अनेक वेळा विमान प्रवाशांना खासगी टॅक्सीचा पर्याय वापरावा लागत असल्याने, या टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची आर्थिक लुट केल्या जात असल्याचे आढळून येते. त्यामूळे एसटीच्या वातानुकूलित सेवेच्या माध्यमातून विमान प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळ करणार आहे. 

मुंबई सेन्ट्रल, परळ, कुर्ला, दादर याठिकाणाहून पुण्यासाठी गाडय़ा सुटतात. त्यांचीही जोडणी राष्ट्रीय मुंबई विमानतळाला देण्यात येऊ शकते का, याची चाचपणी केली जात आहे.

''विमान प्रवाशांना विमानतळावरून योग्य प्रवासी वाहतूक मिळत नाही. शिवाय प्रवाशांची आर्थीक लुट होत असल्याने एसटी प्रवासी आणि उत्पन्नवाढीच्या दृष्ट्रीकोणातून हा प्रयोग करणार आहे. शिवाय बंगळूरूच्या धर्तीवर ही सेवा मुंबई विमानतळावर कशी यशस्वी करता येईल, असा सकारात्मक प्रयत्न राहणार आहे.''
- राहूल तोरो, महाव्यवस्थापक, वाहतूक विभाग एसटी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Board plans to operate Borivali-Pune bus via Mumbai International Airport