नाशिकच्या आर्किटेक्‍ट शर्वरी लथ यांची कलाकृती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

नाशिक ः बौद्धीकदृष्ट्या विशेष गरज असलेल्यांसाठीच्या मुंबईतील जाय वकील फाऊंडेशनतर्फे अमृत महोत्सवानिमित्त "चॅम्पियन्स ऑफ चेंज' या विषयावरील कलाप्रदर्शन झाले. त्यात नाशिकमधील आर्किटेक्‍ट शर्वरी लथ यांच्या फायबर कास्ट मुलाच्या कलाकृतीचा समावेश होता.

वरळीतील ताओ आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन भरले होते. 
वडाळा-मुंबईतील दोन एकर क्षेत्रावर ही संस्था कार्यरत आहे. शाळा, कार्यशाळा असून चार ते पाच वर्षांच्या मुलांपासून प्रौढांपर्यंतच्या पुनर्वसनाचे कार्य संस्थेतर्फे चालते. या संस्थेच्या मदतीसाठी हे कलाप्रदर्शन झाले. शिल्पकार तथा आर्किटेक्‍ट अर्झान खंबाटा यांच्या मार्गदर्शनाखाली 75 कलावंतांची निवड करण्यात आली होती. त्यात शर्वरी लथ यांच्यासह परेश मैती, कृष्ण्माचारी बोस, सुभाष अवचट आदींचा समावेश होता. सर्व कलावंतांच्या कलांचे प्रदर्शन भरत असताना सर्वांनी आपली कला संस्थेला दान केली. त्यांचा लिलाव होऊन त्यातून जमा होणारा निधी संस्थेला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, संस्थेला मदत म्हणून ताओ आर्ट गॅलरी मोफत उपलब्ध करुन देण्यात आली होती. 

कलाप्रदर्शनाला चार दिवसांमध्ये कलावंत, कॉर्पोरेटर सेक्‍टर, विधीज्ञ आदींनी भेट दिली. जगभरातील कलाकृतींचा संग्रह करणारे परवेझ दमानिया, रोशन दमानिया यांनीही प्रदर्शनाला भेट दिली आहे. 
- शर्वरी लथ (आर्किटेक्‍ट) 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai-Art-Exhibition