मंत्रिमंडळाच्या गोंधळात सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या भेटीला 

महेंद्र महाजन ः सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नाशिक ः भाजप-शिवसेनेतर्फे राज्याच्या मंत्रिमंडळाची खेचाखेची सुरु झालेली असताना गोंधळाची परिस्थिती उद्‌भवली आहे. अशा परिस्थितीत भाजपशी जवळीक झालेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी नाशिकला पोचताहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील द्राक्षांसह इतर पिकांची पाहणी करण्याबरोबर ते शेतकऱ्यांशी उद्या शुक्रवारी चर्चा करणार आहेत. 

युतीतील घटक पक्षांच्या बैठकीनंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंत्रीपदाची भूमिका मांडली आहे. हे एकीकडे घडत असताना दुसरीकडे शिवसेनेने विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करत राज्यातील ओल्या दुष्काळाबद्दल दौरा करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही मागणी घेऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला निघाले आहे. त्याचवेळी खोत यांनी मुंबई सोडली असून ते आज सायंकाळपर्यंत नाशिकमध्ये दाखल होताहेत. उद्या सकाळी सटाणा, करंजाड, बिजोटे, द्याने, काळेवाडी, निफाड येथे भेट देऊन मुंबईला परतणार आहेत. खोत यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर दिवाळीची धामधून आटोपताच, कृषी विभागाची यंत्रणा नुकसानीचा प्राथमिक अंदाज जुळवण्यात व्यस्त झालीयं. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Agriculture