शहरात मगरींचा वावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

महाड : सावित्री नदीमध्ये असलेल्या मगरी नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. शहराजवळील केंबुर्ली गावानजीक आणि दादली पुलाजवळ मगरी दिसत असतात. वन विभागाने या परिसराला "मगरप्रवण क्षेत्र' घोषित केले आहे. या मगरी पुराबरोबरच महाड शहरातील अनेक भागात आल्या आहेत. दादली पूल, काकरतळे; तसेच सुकट गल्लीत एका छतावर मंगळवारी मगरी दिसल्या. त्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या मगरी "मार्श क्रोकोडाईल' प्रकाराच्या आहेत. अन्न शोधण्यासाठी त्या आल्या असाव्यात, असा अंदाज प्राणिमित्र गणेश मेहंदळे, चिंतन वैष्णव आणि योगेश गुरव यांनी वर्तवला.

महाड : सावित्री नदीमध्ये असलेल्या मगरी नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. शहराजवळील केंबुर्ली गावानजीक आणि दादली पुलाजवळ मगरी दिसत असतात. वन विभागाने या परिसराला "मगरप्रवण क्षेत्र' घोषित केले आहे. या मगरी पुराबरोबरच महाड शहरातील अनेक भागात आल्या आहेत. दादली पूल, काकरतळे; तसेच सुकट गल्लीत एका छतावर मंगळवारी मगरी दिसल्या. त्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या मगरी "मार्श क्रोकोडाईल' प्रकाराच्या आहेत. अन्न शोधण्यासाठी त्या आल्या असाव्यात, असा अंदाज प्राणिमित्र गणेश मेहंदळे, चिंतन वैष्णव आणि योगेश गुरव यांनी वर्तवला. त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: दादली पूल, काकरतळे; तसेच सुकट गल्लीत एका छतावर मंगळवारी मगरी दिसल्या. त्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.