बेस्टला एक हजार कोटी देण्याची पालिकेकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई - बेस्टची आर्थिक स्थिती बिकट असून डबघाईला आलेल्या बेस्टच्या सक्षमीकरणासाठी बेस्टला एक हजार कोटी रुपये द्या, अशी मागणी बेस्ट प्रशासनाने महापालिका प्रशासनाकडे केली. या सक्षमीकरणासाठी उपक्रमाला मदत करण्यावर गटनेत्यांचे एकमत झाले आहे. सोमवारी (ता. 27) गटनेत्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

"बेस्टची सध्याची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील वाटचाल' याविषयीचे सादरीकरण शुक्रवारी महापालिका मुख्यालयात बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. पाटील यांनी केले. बेस्टची साडेसहा हजार कोटींपर्यंत वाढलेली तूट कमी करण्याबाबतचा आराखडा त्यांनी मांडला. पालिकेने बेस्टला एक हजार कोटींचा निधी दिल्यास बेस्टची आर्थिक कोंडी फुटेल, असे मत त्यांनी मांडले. बेस्टला ही रक्कम बिनव्याजी द्यावी, त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेस्टला मदत करण्यावर गटनेत्यांच्या बैठकीत एकमत झाले. सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीला आयुक्त अजोय मेहता उपस्थित राहणार आहेत.

जमिनींचा व्यावसायिक वापर
बेस्टकडे सुमारे साडेतीनशे एकर जमीन आहे. तिचा वापर व्यवसायांसाठी केल्यास बेस्टला मोठा नफा मिळू शकतो. त्यामुळे ते करण्यास प्राधान्य द्यावे. वातानुकूलित बसगाड्यांमुळे बेस्टला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. या बस ताबडतोब बंद करून नवीन वातानुकूलित बस घ्याव्यात, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी केली.

Web Title: 1 caror municipal demand for best