esakal | लालबागच्या राजाला 1 किलो सोन्याची विट भेट 
sakal

बोलून बातमी शोधा

1 kg gold brick gift to Lalbaug cha raja

लालबागच्या राजाला 1 किलो सोन्याची विट भेट 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लालबागच्या राजाच्या चरणी अज्ञात भाविकाने 1 किलो सोन्याची विट अर्पण केली आहे. तसेच 1 किलो चांदीची विट, 1 किलो चांदीचा हार आणि 1 किलो चांदीचा मोदक बाप्पाच्या भेट म्हणून देण्यात आला आहे. 

गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी सोने आणि चांदीच्या वस्तू अर्पण केल्या. अर्पण केलेल्या सोन्याच्या विटेची किंमत 38 लाख रुपये आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. लालबागचा राजा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने सर्वसमान्य भाविक ते सेलिब्रेटी – राजकारणी येत असतात. दरवर्षी भक्तांकडून लालबागच्या राजाच्या चरणी सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण केल्या जातात. यावर्षी पहिल्याच दिवशी 1 किलो 237 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोन्याचे सोन्याचे ताट व वाटी, चमचे अर्पण केले. या सर्व सोन्याच्या वस्तूंची किंमत 47 लाख रुपये आहे. तर तिसऱ्या दिवशी 1 किलो सोन्याची विट, चांदीचा हार व चांदीचा मोदक बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आले. मागील वर्षीही 1 किलो 101 ग्रॅम वजनाच्या दोन सोनाच्या मूर्ती अर्पण करण्यात आल्या होत्या.

loading image
go to top