अज्ञातांच्या हल्ल्यात युवाकाचा मृत्यू

दीपक घरत
गुरुवार, 5 जुलै 2018

पनवेल : कामोठे वसाबतीतमधील सेक्टर 6 ए येथील दुधे कॉर्नर येथील इमराती बाहेर रात्री 9.20 च्या सुमारास मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी एका 38 ते 40 वयोगटातील इसमावर चाकु आणि बंदुकीच्या गोळ्या झाडून हल्ला केला आहे.

हल्ला करण्यात आलेला युवक आपल्या वॅगनार मोटारीने दुधे कॉर्नर जवळील इमारतीत प्रवेश करत होता. त्या वेळी मोटारीत दोन महिलाही उपस्थित होत्या. हल्ल्यानंतर महिलांनी केलेल्या आरडाओरडीनंतर हल्ला करणाऱ्यांनी खांदेश्वर रेल्वे स्थानकाकडे पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. हल्ल्यामधे गंभीर जखमी झालेल्या युवकास कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: 1 killed in unknowns attack in panvel