कूपर रुग्णालयात रॅगिंगच्या दहा तक्रारी

crime
crime

मुंबई : हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय (कूपर) रुग्णालयातील दहा विद्यार्थ्यांविरोधात रुग्णालय प्रशासनाकडे रॅगिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने थातुरमातुर कारवाई करत ही प्रकरण निकालात काढली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाकडे रॅगिंग संदर्भात विद्यार्थ्यांविरोधात आलेल्या तक्रारींची माहिती मागितली होती.रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात दहा विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तरी 2016 मध्ये रॅगिंग संदर्भात 5 विद्यार्थ्यांविरुद्ध शिस्तभंग वर्तणूक केल्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या होता, तसेच 2018 मध्ये रॅगिंग संदर्भात 5 विद्यार्थ्यांविरुद्ध अर्वाच्च भाषेचा वापर व धामकावण्या बाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होता. तसेच रॅगिंग संदर्भात 2016 मध्ये सदर तक्रारी अनुषंगाने 5 विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वसतिगृहातून 6 महिन्यांकरीता निलंबित करण्यात आलेल्या आहे.

2018 मध्ये सदर तक्रारीच्या अनुषगाने 3 विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वसतिगृहातून 6 महिन्यांकरीता निलंबित करण्यात आलेले आहे.तसेच रॅगिंग संदर्भात कोणत्याही विद्यार्थ्यांला ना दंड आकारण्यात आला ना बरखास्त करण्यात आलं आहे ना रॅगिंग संदर्भात पोलिसात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय (कूपर) रुग्णालयातील अहवालानुसार सन 2015 पासून रॅगिंग विरोधी समितीच्या एकूण 11 बैठका पार पडल्या आहेत. तर रॅगिंग प्रकरणी समितीने आता पर्यंत 8 विद्यार्थ्यांवर फक्त 6 महिन्यांकरीता वसतिगृहातून निलंबनाची कारवाई केल्याच समितीचं म्हणणं आहे.रॅगिंगच्या तक्रारी विरोधात रॅगिंग विरोधी समिती गांभीर्याने चौकशी करत नसून फक्त थातुरमातुर कारवाई करत आहे. ज्यामुळे डॉ.पायल तडवी आत्महत्या सारखी दुर्दैवी घटना घडली असल्याची भावना आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी व्यक्त केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com