नागरिकांच्या दिमतीसाठी पादचारी पूल व चकचकीत रस्ते 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नवी मुंबई  - नेरूळ आणि तुर्भे भागात खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण, जुईपाडा आणि बोनसरी येथे सुसज्ज गटारे व पावणे उड्डाणपुलाजवळ पादचारी पूल अशा विविध नागरी विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे. शनिवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे 10 कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तुर्भे, नेरूळ जुईनगर येथील रहिवाशांची अनेक दिवसांपासून होणारी गैरयोस टळणार आहे. 

नवी मुंबई  - नेरूळ आणि तुर्भे भागात खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण, जुईपाडा आणि बोनसरी येथे सुसज्ज गटारे व पावणे उड्डाणपुलाजवळ पादचारी पूल अशा विविध नागरी विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे. शनिवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे 10 कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तुर्भे, नेरूळ जुईनगर येथील रहिवाशांची अनेक दिवसांपासून होणारी गैरयोस टळणार आहे. 

पावणे ब्रिजजवळ ठाणे-बेलापूर रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. त्याठिकाणी नागरिकांना चालण्यासाठी पदपथ नसल्याने रस्त्यावरून नागरिक ये-जा करीत असतात. त्यामुळे वर्दळीच्या वेळी वाहनांची कोंडी होऊन अपघात होण्याची शक्‍यता भासते. या गोष्टी विचारात घेऊन रस्त्यालगत पदपथ बांधणे व आलोक नाल्यावर फुटब्रिज बांधणे आवश्‍यक आहे. पादचारी पुलाच्या निर्मितीनंतर नागरिक पदपथ व फुटब्रिजचा वापर करतील व रस्त्यावरून चालणार नाहीत. त्यामुळे अपघाताचा संभाव्य धोकाही टळेल. याबरोबरच पावसाळ्यात तेथील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी व रस्त्यावर पाणी साचू नये यादृष्टीने रस्त्याच्या बाजूने पावसाळी ड्रेन बांधणेही आवश्‍यक आहे. अशा प्रकारे ठाणे-बेलापूर रस्त्यालगत पावणे ब्रिजजवळ आलोक नाल्यावर फुटब्रिज बांधण्यात येणार आहे. रस्त्यालगत फुटपाथ व गटर बांधण्यासाठी अंदाजे एक कोटी 66 लाख 23 हजार रकमेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. नेरूळ विभागातील सेक्‍टर 3 व 15 भागांतील रस्त्यांवर काही ठिकाणी नागरी सेवा पुरविणाऱ्या विविध संस्थांमार्फत खोदकाम करण्यात आल्याने रस्ता खराब झाला आहे. तसेच काही ठिकाणी पृष्ठभाग खराब झाला आहे. अशा दूरवस्था झालेल्या रस्त्यांमुळे तेथील रहदारीस व वाहतुकीस होणारा त्रास दूर करण्याच्या दृष्टीने तेथील अंतर्गत रस्त्यांचे 51 लाख 39 हजार रुपयांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. जुईनगर सेक्‍टर 23 व जुईपाडा अंतर्गत भागातील गटारे अरुंद व ठिकठिकाणी तुटलेली असल्यामुळे दोन कोटी 50 लाख खर्च करून दुरूस्त केली जाणार आहेत. 

आणखीन एक सायकल ट्रॅक 
तुर्भे सेक्‍टर 21 येथील उड्डाणपूल ते अन्नपूर्णा चौक या वाशी-तुर्भे लिंक रस्त्यालगतच्या पदपथाचा सायकल ट्रॅक म्हणून पुनर्विकास केला जाणार आहे. या कामासाठी अंदाजे 77 लाख 13 हजार रकमेच्या सुविधा कामाला मंजुरी दिली आहे. यात 911.50 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या पदपथाचा पुनर्विकास, 735 चौरस मीटर क्षेत्रफळाचा सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. 

Web Title: 10 crore has been sanctioned for the development work