Mumbai Building Collapse : डोंगरी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

Mumbai Building Collapse : डोंगरी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

मुंबई : डोंगरी परिसरातील केसरबाई या चार मजली इमाइतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जनांचा दुर्दुवी मृत्यू झाला आहे.यात 6 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे.तर या दुर्घटनेत 8 जखमी झाले असून 2 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

डोंगरी परिसरात अब्दुल हमीद दर्ग्याजवळ असणाऱ्या या इमाइतीचा सकाळी 11:30 च्या दरम्यान कोसळला.ही इमारत शंभर वर्षे जुनी असल्याचं सांगण्यात येत असून या इमारतीत 15 कुटुंबे वास्तव्यास होती. इमारतीचा मागील भाग कोसळल्यानंतर ही सर्व कुटुंबे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली.इमारत दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती तात्काळ पालिकेच्या आपत्कालीन विभागाला दिली.

पालिकेचं पथक,अग्निशमन दल पथक आणि एनडीआरएफच्या दोन पथकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.मात्र डोंगरी हा परिसर दाटीवाटीचा असल्याने बाचावकार्य करण्यास अनेक अडथळे येत आहेत.इमारतीच्याया ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असण्याची भिती व्यक्त होत आहे.

मृतांची नावं (सर्व जेजे रुग्णालय)

1)जावेद इस्माईल, वय- 34 
2)सबिया नासिर शेख, वय-60
3)अब्दुल सत्तार कालू शेख, वय-55
4)मुझामील मन्सूर सलमानी वय- 15
5)सायरा रिहान शेख , वय - 20
6)अरहन शेहजाद, वय- 40
7)कश्यप्पा अमिराजान वय-13
8)सना सलमानी वय- 25
9)झुबेर मन्सूर सलमानी वय-20
10)इब्राहिम, वय- 1.5

जखमी
1) अनोळखी ,पुरुष,3 -हबीब रुग्णालय ( उपचार करून घरी सोडले)
2)फिरोज सलमाना,45,स्त्री-जेजे
3)झीनत रहेमान,30,स्त्री-जेजे
4)आयेशा शेख,4-स्त्री-जेजे
5)अब्दुल रहेमान,3-पु-जेजे (उपचार करून घरी सोडले)
6)नावेद सलमान,30-पु-जेजे
7)इमान हुसेन कलवानी,30,पु-जेजे
8)सलमा अब्दुल शेख,45,स्त्री-जेजे
9)साजिदा सहेजाद जरीवाला,50,स्त्री,जेजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com