वाशीत दहा लाखांची घरफोडी

वाशीत दहा लाखांची घरफोडी
वाशीत दहा लाखांची घरफोडी

नवी मुंबई : वाशी सेक्‍टर-२८ मधील एस. के. ब्रदर्स या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात बुधवारी (ता.३०) पहाटे १० लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह सुनीलकुमार लाहोरीया यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित पुराव्याचे हार्डडिस्क, पेन ड्राईव्ह व इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. वाशी पोलिसांनी या चोरी प्रकरणात सुरेश बिजलाना, अनुराग गर्ग आणि इमॅन्युअल अमोलिक या तिघांवर गुन्हा दाखल केला. 

नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुनीलकुमार लाहोरीया यांची फेब्रुवारी-२०१३ मध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणानंतर वाशी पोलिसांनी सुरेश बिजलाना, अनुराग गर्ग आणि इमॅन्युअल अमोलिक या तिघांना अटक केली असून, सध्या हे तिघे तुरुंगात आहेत. मुलगा संदीप लाहोरिया याने आपल्या वडिलांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित महत्वाचे पुरावे हार्डडिस्क व पेनड्राइव्हमध्ये साठवून ठेवली असून, ते सर्व पुरावे व महत्त्वाची कागदपत्रे त्याने वाशी सेक्‍टर-२८ मधील कार्यालयात ठेवली होती. मंगळवारी रात्री वाशी सेक्‍टर-२८ मधील एस. के. ब्रदर्सचे कार्यालय बंद झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास कार्यालयात ठेवलेल्या १० लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह पुरावे असलेले हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह, लॅपटॉप व इतर महत्वाची कागदपत्रे चोरून नेले. 

लाहोरीया हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी ठाणे येथील सत्र न्यायालयात सुरू असून, या खटल्याची सुनावणी आज होणार होती. मात्र, त्या आगोदरच चोरट्यांनी त्याच्या कार्यालयातील या हत्या प्रकरणाशी संबंधित पुरावे चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी सुरेश बिजलानी, अनुराग गर्ग आणि इमॅन्युअल अमोलिक या तिघांनी ही घरफोडी घडवून आणल्याचा आरोप संदीप लाहोरीया यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com