मुंबईत 10 टक्के पाणीकपात निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

मुंबई - मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू होणार, हे आता निश्‍चित झाले आहे. मुंबईतील निवासी आणि औद्योगिक भागांत 31 जुलै 2019 पर्यंत सरसकट 10 टक्के पाणीकपात लागू करावी, अशी सूचना महापालिका प्रशासनाने केली आहे. त्याबाबतचे निवेदन बुधवारी (ता. 14) स्थायी समितीत प्रशासनाने सादर केले. स्थायी समितीच्या आगामी बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यावर, आठवडाभरात पाणीकपात अमलात येईल, अशी माहिती जलअभियंता विभागाने दिली. 

Web Title: 10 percent water cut in Mumbai