Mumbai News : पूर्व उपनगरे, शहर विभागात १० टक्के पाणी कपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply

Mumbai News : पूर्व उपनगरे, शहर विभागात १० टक्के पाणी कपात

मुंबई : ठाणे येथील कोपरी पुलाजवळ ठाणे महानगरपलिकेतर्फे नवीन पुलाचे काम सुरु असताना मुंबई महानगरपालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई २’ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती होत आहे.

ही गळती दुरुस्तीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गुरुवार ९ मार्च सकाळी १० वाजेपासून शनिवार ११ मार्च सकाळी १० पर्यंतच्या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही परिसरात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिकेने केली आहे. पाणी कपात होणाऱ्या पूर्व उपनगरे आणि शहर विभाग परिसरांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१) पूर्व उपनगरे

टी विभाग मुलूंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग

एस विभागः भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग.

एन विभागः विक्रोळी (पूर्व), घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग

एल विभाग कुर्ला (पूर्व) विभाग

एम/पूर्व विभाग संपूर्ण विभाग

एम/पश्चिम विभागः संपूर्ण विभाग

२) शहर विभाग –

ए विभागः बीपीटी व नौदल परिसर

बी विभागः संपूर्ण विभाग

ई विभागः संपूर्ण विभाग

एफ/दक्षिण विभागः संपूर्ण विभाग

एफ/उत्तर विभाग संपूर्ण विभाग