10 वी पास विद्यार्थ्यांची 60 टक्के फी मनसे भरणार

10 th pass Students 60 percent fee  paying MNS
10 th pass Students 60 percent fee paying MNS

उल्हासनगर - नुकत्याच लागलेल्या 10 वी परीक्षेच्या निकालात जे उल्हासनगरातील तीन विद्यार्थी विविध शाळेत प्रथम आलेत, त्यांची 11 व 12 वी ची 60 टक्के ट्युशन फी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भरणार आहे. मनसेने मानवतेच्या दृष्टिकोनातून हे सकारात्मक पाऊल उचलल्याने पालक वर्गांचा आर्थिक भार कमी होणार असल्याने विद्यार्थी सुखावून जाणार आहेत, असा विश्वास फी भरण्यासाठी पुढाकार घेणारे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप गोडसे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ट्युशन फीची गिफ्ट विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.मनसे नेते राजू पाटील, सरचिटणीस प्रकाश भोईर, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरात प्रथमच ट्युशन फी गिफ्टचा लक्षवेधक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरात जेव्हड्याही शाळा आहेत त्यात ज्या विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी पहिल्या तीन मध्ये मजल मारलेली आहे त्यांची 60 टक्के, जे 80 टक्यांच्या वर आलेत त्यांची 50 टक्के आणि जे 60 टक्यांच्या वर आहेत त्यांची 40 टक्के ट्युशन फी मनसेच्या वतीने भरली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी 10 जुलै पर्यंत लालचक्की येथील मनसे लालगड कार्यालयात नावनोंदणी करावी असे प्रदिप गोडसे यांनी सांगितले.

शहरातील विद्यार्थ्यांना नावनोंदणी साठी अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी मनसेचे पदाधिकारी सचिन कदम,संजय घुगे,बंडू देशमुख,शालिग्राम सोनवणे,शैलेश पांडव,ऍड.अनिल जाधव,सचिन बेंडके, मैनुद्दीन शेख, मुकेश सेटपलानी, सागर चौहान, प्रमोद पालकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील प्रदिप गोडसे यांनी केले आहे.

दरम्यान उल्हासनगर महानगरपालिका मध्ये एकही नगरसेवक नसतानाही सातत्याने विविध आंदोलनाद्वारे चर्चेत राहणाऱ्या मनसेने ट्युशन फी भरण्याचा उपक्रम हाती घेतल्याने हा कौतुकाचा विषय बनला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com