संक्रांतीच्या दिवशीच कंक्रांत, शेणात बुडून 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

अनिश पाटील
Thursday, 14 January 2021

पतंग पकडण्यासाठी गेलेल्या 10 वर्षाच्या मुलाचा शेणापासून तयार झालेल्या दलदलीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी कांदिवली येथे घडली

मुंबई, ता.14ः  पतंग पकडण्यासाठी गेलेल्या 10 वर्षाच्या मुलाचा शेणापासून तयार झालेल्या दलदलीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी कांदिवली येथे घडली. दुर्गेश जाधव असे या मुलाचे नाव असून तो पाचवीतील विद्यार्थी होता. तो तेथीलच शंकरपाडा परिसरात एसआरए इमारतीत रहायचा. गोठ्या शेजारी पंतग पकडण्यासाठी गेला असता या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

धनंजय मुंडे प्रकरण : "व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील", रेणू शर्माच्या वकिकांचा खळबळजनक दावा

दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडला. त्याला इमारती शेजारी पतंग खाली पडत असताना दिसला. तो पाठलाग करत घटनास्थळी पोहोचला. तेथे दोन शीटच्यामध्ये त्याचा पाड अडकून पडला. त्यावेळी तेथे शेण साठवण्यात आले होते. त्यामुळे सुमारे पाच फुट खोल दलदल तयार झाली होती. हा प्रकार युसुफ नावाच्या तरूणाने शेजारच्या इमारतीतून पाहिला. तोही त्याला वाचवण्यासाठी गेला असता तो ही अर्धवत शेणात रुतला.

महत्त्वाची बातमी : पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? जयंत पाटील यांची थेट प्रतिक्रिया

त्यानंतर शेजारच्या निर्माणाधीन इमारतीतील कामगार तेथे पोहोचले व त्यांनी क्रेनच्या सहाय्याने दोघांना बाहेर काढले. त्यावेळी जाधवला मृत घोषित करण्यात आले. याबाबतची माहिती दिल्यानंतर कांदिवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

10 year old boy dies after drowning in dung at kandivali


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 year old boy dies after drowning in dung at kandivali