दहा वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक

किरण घरत
शुक्रवार, 23 मार्च 2018

कळवा : कळव्यातील महात्मा ज्योतिबा फुले नगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या तिसरी मध्ये शिकणाऱ्या दहा वर्षीय मुलीला तिच्या राहत्या घराच्या पाठीमागील एका रिकाम्या पत्र्याच्या झोपडया मध्ये नेऊन आत्याचार केल्या प्रकरणी कळवा पोलिसांनी गुरुवारी रात्री आरोपीला अटक केली आहे.

पिडीत मुलगी सोमवारी (ता. 19) रात्री दहाच्या सुमारास आपल्या परिसरात सुरू असलेला रामलीला कार्यक्रम पहायला गेली होती. हा कार्यक्रम अर्धा सोडून रात्री 10 च्या सुमारास आपल्या घरी परत येत असताना तिच्या घराजवळ आल्यावर तिच्या परिसरातील मजुरी करणाऱ्या जितलाल वर्मा (वय 30) याने अंधाराचा फायदा घेऊन तिचे तोंड दाबून जबरदस्तीने तिला तिच्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या एका रिकाम्या पत्र्याच्या झोपड्यात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

मुलीला त्रास होऊ लागल्याने ती मोठयाने रडून ओरडू लागल्याने 'कुणाला सांगू नकोस नाही तर तुला मारेन' असा दम देऊन तो तेथून पळून गेला. घडलेली घटना पीडित मुलीने आपल्या आईला सांगितल्यावर आरोपी वर कळवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी फरार असलेल्या आरोपी जितलालला कळवा महात्मा फुले नगर परिसरातुन गुरुवारी रात्री अटक केली असून शुक्रवारी (ता. 23) सकाळी ठाणे न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे,
 
Web Title: 10 years old girl tortured accused arrested