
Mumbai News : शिंदे - फडणवीस सरकारकडून महिन्याला १०० कोटींची मदत
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्याने महिन्याच्या अखेर वेतनासाठी सुद्धा एसटीकडे पैसे शिल्लक राहत नसल्याने राज्य शासनाच्या मदतीच्या भरवश्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
महाविकास आघाडी सरकार मध्ये तत्कालीन उपुमख्यमंत्री अजित पवार यांनी महिन्याला ३६० कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, या नविन सरकारमध्ये त्याची पुर्तता केली गेली नाही. मात्र, आता नव्याने नियमीत मिळणारे २२० कोटीचे सवलत मुल्य आणि १०० कोटी अधीक असे एकूण मासीक ३२० कोटी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नाही. एसटी प्रशासनाकडून दर महिन्याला वेतनाच्या मदतीसाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला जातो. मात्र, नेहमीप्रमाणे त्यावर गृहविभागाची गंभीरता न दाखवता, निधी मंजुरीला उशिर केला जातो, परिणामी एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन १० ते १५ दिवस उशिराने गेल्या महिन्यात झाले आहे.
राज्यात सुमारे एक लाखांपेक्षा जास्त एसटीचे कर्मचारी, अधिकारी आहे. मात्र त्यांच्या वेतनाचा प्रश्न आता सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसटीच्या सार्वजनिक प्रवासी सेवेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या सुमारे २९ प्रवासी सवलत योजना राबवल्या जाते. त्याचे मासिक सवलत मुल्य महिन्याला सुमारे २२० कोटी नियमीत एसटीला शासनाकडून दिले जाते.
त्यामूळे शिंदे-फडणविस सरकार फक्त १०० कोटी अतिरीक्त मदत मिळणार असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पान पुसल्याची टिका एसटी कर्मचारी संघंटनांकडून केली जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला दर महिन्याला ३६० कोटी रुपये लागतात ती पूर्ण रक्कम न देता सवलत मूल्य २२० कोटी रुपये व अजून फक्त १०० कोटी रुपये सरकार देणार आहे. ही शुद्ध फसवणूक आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस