बिल न दिल्याने १० हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

प्रवाशांना खाद्यपदार्थांचे बिल न देणे मध्य रेल्वेच्या स्थानकांतील तीन स्टॉलना महागात पडले आहे. सीएसएमटी, कुर्ला व एलटीटी या स्थानकांतील खाद्यपदार्थांच्या स्टॉलना प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

मुंबई - प्रवाशांना खाद्यपदार्थांचे बिल न देणे मध्य रेल्वेच्या स्थानकांतील तीन स्टॉलना महागात पडले आहे. सीएसएमटी, कुर्ला व एलटीटी या स्थानकांतील खाद्यपदार्थांच्या स्टॉलना प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

आतापर्यंतच्या कारवाईत २० प्रवाशांना मोफत खाद्यपदार्थ देण्यात आले आहेत. स्थानकांतील स्टॉलवर ग्राहकांना बिल देणे बंधनकारक करण्यात आले असून, मध्य रेल्वेने २ जुलैपासून तपासणी मोहीम सुरू केली आहे. या विशेष मोहिमेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कुर्ला स्थानकातील स्टॉलधारक प्रवाशांना बिल देत नसल्याचे, तर लोकमान्य टिळक टर्मिनसमधील एका स्टॉलमध्ये पीओएस मशनि नसल्याचे आढळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10000 fine to railway station food stall crime