मुंबई विमानतळाचा नवा उच्चांक;दिवसभरात 1003 विमानांचे उड्डाण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 24 तासात (5 जून) सुमारे 1003 विमानांची वाहतूक (टेक ऑफ व लॅंडिंग) हाताळून नवा उच्चांक नोंदवला आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या जीव्हीकेने हा बहुमान मिळवला आहे. 

मुंबई - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 24 तासात (5 जून) सुमारे 1003 विमानांची वाहतूक (टेक ऑफ व लॅंडिंग) हाताळून नवा उच्चांक नोंदवला आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या जीव्हीकेने हा बहुमान मिळवला आहे. 

मुंबई विमानतळावर मंगळवारी (5 जून) 1003 विमानांची ये-जा (लॅंडिंग व टेकऑफ) झाली. विमानतळाच्या जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली. यापूर्वी दिवसाला 988 विमानउड्डाणे हाताळणाऱ्या या विमानतळाने आता स्वत:चा विक्रम मोडला आहे. एका दिवसात एकेरी धावपट्टीवर भारतातील सर्वात जास्त वाहतुकीचा हा विक्रम आहे. एकेरी धावपट्टी असलेले जगातील सर्वात मोठे विमानतळ अशी मुंबई विमानतळाची ओळख आहे. 

मुंबई विमानतळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ असले तरी, ब्रिटनचा गॅटविक विमानतळ हा जगातील एकेरी धावपट्टी असलेला दुसरा सर्वात मोठा विमानतळ आहे. मुंबई विमानतळाची धावपट्टी ही जगातील सर्वांत जास्त व्यग्र धावपट्टी म्हणून परिचित आहे. हा उच्चांक गाठण्यासाठी यामागे असलेल्या व्यवस्थापनाचे महत्त्वाचे योगदान आहे. 

मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसादरम्यान काही विमाने शेजारच्या विमानतळावर वळवण्यात आली होती. काही वेळानंतर पावसाचा जोर ओसरल्यावर पुन्हा मुंबई विमानतळावरील वाहतूक पूर्ववत झाली. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ व्हावे हे जीव्हीकेचे ध्येय आहे, अशी माहिती जीव्हीकेच्या प्रवक्‍त्यांकडून देण्यात आली. 

विमानवाहतुकीची गगनभरारी 
24 नोव्हेंबर 2017 - 969 विमानांची ये-जा 
6 डिसेंबर 2017 - 974 विमानांची ये-जा 
20 जानेवारी 2018 - 988 विमानउड्डाणांची हाताळणी 

Web Title: 1003 takeoffs and landings on Mumbai airport