मृत्यूतांडव ! राज्यात दिवसभरातील कोरोनामुळे 'बळी' गेलेल्यांची संख्या 'धडकी' भरवणारी, तर...

coronavirus
coronavirus

मुंबई : राज्यात बुधवारी 105 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांचा आकडा 1897 वर पोहोचला. राज्यात एकाच दिवसात शंभराहून अधिक मृत्यूंची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे; मात्र त्यापैकी 39 मृत्यू दोन दिवसांपूर्वीचे आहेत. राज्यात 2190 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, बाधितांची संख्या 56,948 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 17,918 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 37,125 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आणखी 105 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत 32, ठाण्यात 16, जळगावमध्ये 10, पुण्यात नऊ, नवी मुंबई आणि रायगडमध्ये सात,  अकोल्यात सहा, औरंगाबादमध्ये चार, नाशिक आणि सोलापूरमध्ये तीन, साताऱ्यात दोन; तसेच नगर, नागपूर, नंदुरबार, पनवेल, वसई-विरार येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. गुजरातमधील एका रुग्णाचे मुंबईत निधन झाले. मृतांमध्ये 72 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. दगावलेल्या रुग्णांपैकी 50 जण 60 वर्षे किंवा त्यावरील, 45  जण 40 ते 59 वर्षे वयोगटातील व 10 जण 40 वर्षांखालील होते. त्यापैकी 66 रुग्णांना (63 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोव्हिड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1897 वर पोहोचली आहे. 

बुधवारी नोंद झालेल्या एकूण 105 मृत्यूंपैकी 39 मृत्यू मागील दोन दिवसांतील, तर उर्वरित  66 मृत्यू 21 एप्रिल ते 24 मे या कालावधीतील आहेत. या 66 मृतांमध्ये मुंबईतील 21, ठाण्यातील 15, जळगावमधील 10, नवी मुंबई व रायगडमधील सात, अकोला, सातारा येथील प्रत्येको दोन; तसेच नगर व नंदुरबारमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

कोव्हिड ताळेबंद

  • नवे कोरोनामुक्त : 964  
  • आतापर्यंत बरे झालेले : 17,918 
  • तपासलेले नमुने : 4,03,976 
  • पॉझिटिव्ह : 56,948 
  • क्लस्टर कंटेनमेंट झोन : 2684 
  • एकूण पथके : 17,119 
  • लोकसंख्येचे सर्वेक्षण  : 68.06  लाख

105 patients died in maharashtra state Record of 2190 new corona patient

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com