ग्रामीण भागात 108 सेवाठरत आहे जीवन दायीनी

दीपक हिरे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

वज्रेश्वरी - केंद्र आणि राज्य शासनाच्या विद्यमाने चार वर्षांपूर्वी ग्रामीण भागासाठी 108 रूग्णवाहिका ही राष्ट्रीय रूग्णवाहिका सेवा सह आरोग्य सेवा सुरू झाली. याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब व गरजूंनी या सेवेचा लाभ घेतला. ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी ग्रामीण भागातील आदिवासी आणि इतर गोरगरीब रुग्णांनाही या सेवेचा लाभ मिळाल्याने त्यांच्यासाठी ही सेवा संजीवनी ठरली आहे.

वज्रेश्वरी - केंद्र आणि राज्य शासनाच्या विद्यमाने चार वर्षांपूर्वी ग्रामीण भागासाठी 108 रूग्णवाहिका ही राष्ट्रीय रूग्णवाहिका सेवा सह आरोग्य सेवा सुरू झाली. याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब व गरजूंनी या सेवेचा लाभ घेतला. ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी ग्रामीण भागातील आदिवासी आणि इतर गोरगरीब रुग्णांनाही या सेवेचा लाभ मिळाल्याने त्यांच्यासाठी ही सेवा संजीवनी ठरली आहे.

भिवंडी तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गमबहुल भाग आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामिण आरोग्य विभागामार्फत स्थापन झालेले प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ग्रामिण गाव व पाडे खूप लांबवर असल्याने त्यांना वेळेवर साधन नसल्याने रूग्णांना खाटेवर टाकून त्यांना चालत प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जावे लागत असे. तर काही वेळा आरोग्य केंद्रांमधील रु ग्णवाहिका नादुरु स्त असल्याने किंवा वेळेवर चालक उपलब्ध नसल्याने रूग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचता येत नव्हते.त्यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांना उपचारा अभावी जीव गमवावा लागल्याच्या घटना या पुर्वी घडल्या आहेत. परंतु 108 रूग्णवाहिका सेवा सुरू झाल्यानंतर  विनामूल्य डॉक्टर समवेत उपलब्ध होत असल्याने आतापर्यंत ग्रामिण भागातील हजारो जणांचा जीव वाचला आहे. ठाणे जिल्हा हा मुंबईलगत असल्याने या तसेच येथील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली येथील तानसा नदीत बुडनारे व अंबाडी वासींद हायवे, सिरसड रस्ता असे राज्य महामार्ग जात आहे. यामार्गावर नेहमी लहान-मोठे अपघात घडत असतात. अशा वेळी ही रूग्णावाहिका सेवा खूप फायदेशीर ठरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामिण भागासाठी एकूण 40 अत्याधुनिक रूग्णवाहिका धावत आहेत. त्यासाठी 120 डॉक्टरांची नियुक्ती असुन 94 चालकांद्वारे ही मोफत सुविधा संपुर्ण जिल्ह्यात दिली जात आहे. सुपरवायझर मिलींद कांबळे, व्यवस्थापक रवींद्र माने, उपव्यवस्थापक जितेंद्र मोरे यांच्या नियंत्रणाव्दारे ही सेवा सुरू आहे. 108 नंबरवर कॉल केल्यावर रु ग्णवाहिका डॉक्टरसमवेत उपलब्ध होते. त्यामुळे घटनास्थळी रूग्णावाहिका पोहचून रु ग्णवाहिकेमध्ये डॉक्टारांमार्फत रूग्णांवर उपचार केले जातात. तसेच गरज पडल्यास पुढील उपचारासाठी रूग्णास जवळील रु ग्णालयात अथवा प्राथमिक आरोग्य 

आत्ता पर्यंत चार वर्षात  अपघा6813,प्रसुती 23,789, ह्रदयविकार 456, आगीत जळालेले 654,विषबाधा 3714 विद्युतप्रवाह 101, पडून जखमी झालेले 4755, मोठे अपघात 418, जखमी 247, आत्महत्या प्रयत्न 154,हल्ले व दंगे 1217 इतर अपत्कालीन 72519 या रूग्णांना सेवा पुरविल्या आहेत.केंद्रात दाखल केले जाते. गेल्या चार वर्षात  ग्रामिण भागातील सुमारे 1 लाख 15 हजार गरजूंनी व रूग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून हजारो रूग्णांचे प्राण वाचविण्यात 108 रूग्णावहिकेच्या टीमला यश आले आहे.

"मागच्या वर्षी वज्रेश्वरी येथे एका खाजगी बसला अपघात झाला होता त्यावेळी आम्हीच घटनास्थळी 10 रु ग्णवाहिका त्वरीत उपलब्ध करून देत 32 जखमींवर वेळीच उपचार केले होते. ही घटना आम्हाला खूप समाधान करून देत आहे."
-मिलींद कांबळे, जिल्हा सुपरवायझर

"या रूग्णवाहिका सेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ मिळविण्यासाठी 108 क्रमांकवर कॉल करून सुविधा घेतली पाहिजे.
- रवींद्र माने, जिल्हा व्यवस्थापक

Web Title: 108 is helpful in rural areas