मुंबईत डेंगीचे 109 रुग्ण

dengue
dengue

मुंबई : पावसाळा लांबल्याने मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी पाणी साठून राहिल्याने ऑक्‍टोबरच्या पंधरवड्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या 109 पर्यंत पोहोचली असून, तब्बल 1970 रुग्णांमध्ये डेंगीची लक्षणे आढळली आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेचे आरोग्य खाते सतर्क झाले आहे. पालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयात साथीच्या रुग्णांची संख्या वाढली असून, मुंबईकरांचे आरोग्य बिघडले आहे. 

पावसाळ्यात मुंबईत दर वर्षी साथीचे आजार डोके वर काढतात. यंदाही साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा पावसाळा लांबल्याने साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने विभागवार पथके तैनात करण्यात आली आहेत. जोगेश्वरी, मानखुर्द, कुर्ला, माटुंगा, अंधेरी, ग्रॅंट रोड आणि चेंबूर या परिसरात डेंगीचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. या भागातील पालिका आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्‍यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंगी, मलेरिया आणि लेप्टो रुग्णांच्या संख्येत घट झाली असून उपाययोजना सुरू असल्याची माहिती महापालिका मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर दिली. 
------------------------ 
ऑक्‍टोबरच्या पंधरवड्यातील संख्या 
डेंगी : 109 
लेप्टोस्पायरोसिस : 240 
मलेरिया : 172 
कावीळ : 45 
------------------------ 
एखादा दिवस भांडी कोरडी करा 
घरात साठवून ठेवलेल्या पाण्यात तसेच शोभेची झाडे लावलेल्या भांड्यात पाणी साचून तेथे डेंगीचे डास आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस भांडी कोरडी ठेवावीत, अशा सूचना आरोग्य खात्याने दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com